Join us  

बॉबी देओल नुकताच मुंबईत दिसला पत्नीसोबत, एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते त्याची पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 12:12 PM

बॉबीला नुकतेच त्याच्या पत्नीसोबत मुंबईमधील एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आले.

ठळक मुद्देतान्या काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तान्या ही दिसायला अतिशय सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते. 

बॉबी देओल अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असला तरी त्याच्या पत्नीला आपल्याला खूपच कमी वेळा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी त्याच्यासोबत पाहायला मिळते. बॉबीच्या पत्नीचे नाव तान्या असून तिच्या सौंदर्याची नेहमीच तारीफ केली जाते. बॉबीला नुकतेच त्याच्या पत्नीसोबत मुंबईमधील एका हॉटेलच्या बाहेर पाहाण्यात आले. त्याची पत्नी तान्या आणि तो डिनरसाठी गेले होते. बॉबीने यावेळी ब्लॅक शर्ट आणि क्रीम रंगाची पँट घातली होती तर तान्या देखील काळ्या रंगाच्या कपड्यात दिसली. तान्या काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तान्या ही दिसायला अतिशय सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीइतकीच सुंदर दिसते. 

बॉबी देओल आणि तान्या १९९६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना दोन मुले असून बॉबी अनेकवेळा त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या फॅमिलीचे फोटो पोस्ट करत असतो. बॉबी आणि तान्याची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाहीये. होय, बॉबी अगदी पहिल्याच नजरेत तान्याच्या प्रेमात पडला होता. बॉबी आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पित होता. त्याठिकाणी तान्याही बसलेली होती. बॉबीने जेव्हा तान्याला बघितले तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. पुढे बॉबीने लगेचच तान्याबद्दलची माहिती काढली.

काहीच दिवसांत बॉबी आणि तान्या यांच्यात बोलणे सुरू झाले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठीही व्हायला लागल्या. त्यानंतर एकेदिवशी बॉबी तान्याला त्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला, ज्याठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला बघितले होते. तिथेच त्याने तिला प्रपोज केले. पुढे दोघांचेही परिवारातील लोक एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात लग्नाची बोलणी सुरू झाली.  

बॉबीचे वडील अभिनेते धर्मेंद्र यांना तान्या खूपच पसंत पडली. त्यामुळे त्यांनी लगेचच ‘चट मंगनी, पट ब्याह’ उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. अशापद्धतीने १९९६ मध्ये तान्या आणि बॉबीने साताजन्माच्या गाठी बांधल्या. तान्या एका मोठ्या उद्योगपती घराण्यातून आहे. त्यांचा खूप मोठा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा ‘द गुड अर्थ’ या नावाने बिझनेस आहे. तान्या देखील स्वत: एक डिझाईनर आहे.

टॅग्स :बॉबी देओल