Join us  

धर्मेंद्र यांच्या बर्थडेला बॉबी देओलने शेअर केला लहानपणीचा क्युट फोटो, लिहिली भावूक पोस्ट

By गीतांजली | Published: December 08, 2020 12:30 PM

बॉबी देओलने आपले वडील धर्मेंद्र यांनी स्पेशल अंदाजात बर्थडे विश केले आहे.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्र आज आपला 85 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खासदिवशी सेलिब्रिटींसह चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत  आहेत. या खास प्रसंगी बॉबी देओलने आपले वडील धर्मेंद्र यांनी स्पेशल अंदाजात बर्थडे विश केले आहे. बॉबीने वडिलांसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअर केली आहे.

बॉबी देओलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वडिलांना दिसतो आहे. बॉबी देओल त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसलेला आहे. खास गोष्ट म्हणजे फोटोत वडील आणि मुलगा यांनी मॅचिंग शर्ट घातलेला आहे. बॉबी देओल फोटोत वडिल धर्मेंद्र यांच्या गालावर किस करताना दिसतो आहे. हा पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने इमोशनल मेसेजसुद्धा लिहिला आहे.  “लव्ह यू पापा. हॅप्पी बर्थडे '' असे कॅप्शन बॉबीने या फोटोला दिले आहे.

धर्मेंद्र यांच्या लाखो चाहत्यांनी हा फोटो शेअर केले आहे. कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बॉबी देओल सध्या आपल्या 'आश्रम' वेबसिरीजला चर्चेत आला आहे. एमएक्स प्लेअरच्या या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने धोंगी बाबाची व्यक्तिरेखा साकारली आहे, जो धर्माच्या वेषात सर्व काळे धंदे करतो. वेबसिरीजचा पहिला आणि दुसरा भाग खूप लोकप्रिय झाला आहे आणि आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची वाट पाहत आहेत.  

टॅग्स :धमेंद्रबॉबी देओल