Join us  

 आता अशी दिसते बॉबी देओलची हिरोईन नेहा! २१ वर्षांपूर्वी केला होता डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 2:23 PM

मंगळवारी रात्री अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. या पार्टीत मनोज पत्नी नेहासोबत दिसला. आता ही नेहा कोण? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तीच ती बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन.

ठळक मुद्देनेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे.

मंगळवारी रात्री अभिनेता मनोज वाजपेयीच्या वाढदिवसाची पार्टी रंगली. या पार्टीत मनोज पत्नी नेहासोबत दिसला. आता ही नेहा कोण? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. तीच ती बॉबी देओलची ‘करीब’मधली हिरोईन. होय, नेहाने अनेक चित्रपटांत काम केले. ‘करीब’हा नेहाचा पहिला चित्रपट. यानंतर होगी प्यार की जीत , फिजा , राहुल , आत्मा  अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली. ‘करीब’ची ही हिरोईन गेल्या अनेक वर्षांत इतकी बदललीय की, तिला ओळखणे कळीण व्हावे.

नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता.

माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते. 

अर्थात ‘करीब’मध्ये नेहा नावाने एन्ट्री केल्यानंतर पुढे तिने आपले खरे नाव वापरणे सुरु केले होते. नाव बदलण्याची काहीही गरज नाही. पण चित्रपटांत येताच नाव का बदलावे लागते, ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडची आहे, असे तिने म्हटले होते. लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा व मनोज रिलेशनशिपमध्ये होते.

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉबी देओल