Join us  

फ्लॉप अभिनेता असूनही बॉबीकडे आहे करोडोची मालमत्ता, हा आहे त्याचा साईड बिजनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:55 PM

बॉबीचे फिल्मी करियर हिट नसले तरी त्याच्याकडे एखाद्या हिट अभिनेत्याइतकाच पैसा आहे.

ठळक मुद्देबॉबीकडे करोडो रुपयांची मालमत्ता असून तो अतिशय महागड्या गाड्या वापरतो. बॉबीचे मुंबईत दोन चायनिज रेस्टॉरन्ट असून ते दोन्ही फेमस आहेत. या रेस्टॉरन्टद्वारे बॉबीला चांगलाच पैसा मिळतो.

बॉबी देओलचा आज वाढदिवस असून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा तो मुलगा आहे. घरातच फिल्मी वातावरण असल्याने तो खूपच कमी वयात अभिनयक्षेत्राकडे वळला. त्याने धर्मवीर या चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तो बालकलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने बरसात या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 

बॉबीला बरसातनंतर बॉलिवूडमध्ये यश मिळेल असे वाटत असतानाच त्याने एकामागोमाग सगळेच चित्रपट फ्लॉप व्हायला लागले. दरम्यानच्या काळात तर त्याला कोणत्याही चित्रपटात काम देखील मिळत नव्हते.  

बॉबी देओलला प्रेक्षकांना नुकतेच हाऊसफुल 4 या चित्रपटात पाहायला मिळाले. त्याआधी त्याने रेस 3 या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाद्वारे त्याने अनेक वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केला. पण सध्या त्याच्याकडे कोणताच चित्रपट नाहीये. बॉबीने त्याच्या करियरमध्ये आजवर केवळ तीन सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये गुप्त, सोल्जर आणि अजनबी या चित्रपटांचा समावेश आहे. त्याच्या हमराज या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. बॉबीचे फिल्मी करियर हिट नसले तरी त्याच्याकडे एखाद्या हिट अभिनेत्याइतकाच पैसा आहे.

बॉबीकडे करोडो रुपयांची मालमत्ता असून तो अतिशय महागड्या गाड्या वापरतो. बॉबीचे मुंबईत दोन चायनिज रेस्टॉरन्ट असून ते दोन्ही फेमस आहेत. या रेस्टॉरन्टद्वारे बॉबीला चांगलाच पैसा मिळतो. एवढेच नव्हे तर तो डीजे म्हणून देखील काम करतो. मुंबईतील जुहू परिसरात त्याचे एक मोठाले घर असून त्याची किंमत जवळजवळ आठ ते दहा करोडच्या घरात आहे. तसेच पंजाबमध्ये त्याचे एक फार्महाऊस देखील आहे. 

 

टॅग्स :बॉबी देओल