Join us  

 मान गए सरजी...! अनुपम खेर यांना सेटवरच आला होता पॅरालिसिसचा अटॅक, पण शूट केला ‘तो’ सुपरहिट सीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 8:00 AM

 आला होता पॅरॉलिसिसचा अटॅक, लोकांनी वाटली ‘अ‍ॅक्टिंग’  

ठळक मुद्देचेहरा वाकडा असतानाही त्यांनी ‘हम आपके है कौन’चे शूटिंग केले. त्यामुळेच या सिनेमाच्या सीन्समध्ये अनुपम खेर यांचा एकही क्लोज शॉट घेण्यात आलेला नाही.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आज (7 मार्च) वाढदिवस.  7 मार्च 1955साली शिमल्यातील एका काश्मिरी पंडित कुटुंबात अनुपम यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता बनण्याच्या इच्छेने अनुपम खेर मुंबईत आले. संघर्षाच्या काळात फुटपाथ आणि रेल्वे स्टेशनवर झोपण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण अनुपम डगमगले नाहीत. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुपम यांनी बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटला. 35 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपटांत काम केले.  मात्र ‘हम आपके कौन है’च्या शूटींगदरम्यान अनुपम यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला होता.

होय, या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यन अनुपम यांच्या चेह-याच्या उजव्या भागाला लकवा मारला होता. या सिनेमात अनुपम माधुरी दीक्षित व रेणुका शहाणेच्या पित्याची भूमिक साकारत होते. चित्रीकरण सुरु असतानाच अचानक अनुपम यांना फेशिअल पॅरालिसिसचा अटॅक आला होता. आधी थकव्यामुळे काहीतरी होत असावे,असे त्यांना वाटले. पण दुसºया दिवशी ब्रश करताना तोंडातून आपोआप पाणी बाहेर पडत असल्याचे आणि चेहराही वाकडा होत असल्याचे त्याना जाणवले. यानंतर अनुपम लगेच डॉक्टरांकडे पोहोचले.

ऐकून आश्चर्य वाटेल पण  डॉक्टरांनी त्यावेळी अनुपम यांना 2 महिने काम बंद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र डॉक्टरकडून तपासणी झाल्यानंतर अनुपम खेर थेट ‘हम आपके कौन है’च्या शूटिंगसाठी पोहचले होते. अनुपम खेर यांचा वाकडा झालेला चेहरा पाहून कुणालाच काही कळले नाही. सलमान खान आणि माधुरीला तर ते मस्करी करत आहेत, असेच वाटले होते. मात्र सत्य सांगितल्यानंतर सिनेमाची टीम हादरली होती. अशा परिस्थितीतही अनुपम खेर यांनी  सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय  घेतला. 

चेहरा वाकडा असतानाही त्यांनी ‘हम आपके है कौन’चे शूटिंग केले. त्यामुळेच या सिनेमाच्या सीन्समध्ये अनुपम खेर यांचा एकही क्लोज शॉट घेण्यात आलेला नाही. एका सीनमध्ये मात्र अनुपम खेर यांचा चेहरा वाकडा झाल्याचे दिसते. या सीनमध्ये अनुपम खेर यांनी ‘शोले’तील धर्मेंद्रच्या वीरुप्रमाणे दारु प्यायल्याची अ‍ॅक्टिंग केली होती.  त्या सीनमध्ये चेहरा वाकडा असूनही ते अ‍ॅक्टिंगच करत असल्याचे आजही रसिकांना वाटते.

टॅग्स :अनुपम खेर