Join us  

इंटिमेट सीन करण्यास प्रियंका चोप्राने दिला होता नकार, भडकले होते अन्नू कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 8:00 AM

‘सात खून माफ’ या चित्रपटाचा एक किस्सा...

ठळक मुद्दे ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियंकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका अनु कपूर यांच्या वाट्याला आली होती.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि निवेदक अन्नू कपूर यांचा आज वाढदिवस.  मध्य प्रदेशातील भोपाळ मधील इटवारा येथे २० फेब्रुवारी १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला झाला. अन्नू कपूर यांचे खरे नाव आहे अनिल कपूर. होय, त्यांना अन्नू कपूर हे नाव दिले ते ‘तेजाब’ या सिनेमाने. ‘तेजाब’मध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. अशात याच नावाचा आणखी एक कलाकार या चित्रपटात घ्यायचा म्हटल्यावर नावात गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे नावातील गोंधळ टाळण्यासाठी त्यांचे नाव अन्नू कपूर ठेवण्यात आले.

आज अन्नू कपूर यांच्याशी निगडीत ‘सात खून माफ’ या चित्रपटाचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. होय,‘सात खून माफ’  या सिनेमात प्रियंका चोप्रा लीड रोलमध्ये होती. या चित्रपटात अन्नू कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटात प्रियंकाच्या सात पतींपैकी एका पतीची भूमिका अनु कपूर यांच्या वाट्याला आली होती. चित्रपटाच्या कथेनुसार प्रियंका व अन्नू कपूर यांच्यात काही इंटिमेट सीन्स शूट होणार होते. पण प्रियंकाने अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन करायला स्पष्ट नकार दिला. मग काय, तिच्या या नकाराने अन्नू कपूर चांगलेच भडकले होते.

अन्नू कपूर माझे वडिल अशोक चोप्राचे मित्र आहेत. माझ्या वडिलांच्या मित्रासोबत मी इंटिमेट सीन देणार नाही, असे प्रियंकाने ‘सात खून माफ’ च्या मेकर्सला स्पष्ट सांगितले. पण अन्नू कपूर तिचा हा नकार कदाचित पचवू शकले नाहीत. ‘मी सुंदर नाही, हिरोही नाही. मी सुंदर असतो तर तिने माझ्यासोबत इंटिमेट सीन केले असते. कारण तिला दुस-या हिरोसोबत इंटिमेट सीन करण्यास काहीही अडचण नाही. टॅलेंट वगळले तर सुंदर दिसणे हेच महत्त्वाचे आहे,’ अशा शब्दांत अन्नू कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

अनु कपूर यांची ही प्रतिक्रिया प्रियंकासाठी चांगलीच शॉकिंग होती. पुढे एका मुलाखतीत प्रियंका यावर बोलली होती. ती म्हणाली होती, ‘मी सुंदर नाही, हिरो नाही,म्हणून ती माझ्यासोबत इंटिमेट सीन्स द्यायला तयार नाही, असे अन्नू कपूर म्हणाल्याचे मी वाचले. त्यांच्यासोबतचे इंटिमेट सीन्स स्क्रिप्टमध्ये नव्हतेच. त्यांना इंटिमेट सीन्स करायचे असतील, तर त्यांनी तसे चित्रपट निवडावे. असे बोलणे अन्नू कपूर यांना शोभत नाही.  त्यांच्या या शब्दांनी मी दुखावले जाऊ शकते, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी.’ अर्थात यानंतर अनु कपूर यांनी आपण असे काही म्हटलेच नसल्याचे सांगत, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :अन्नू कपूरप्रियंका चोप्रा