Join us  

Birthday Special : या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने केली होती एचआयव्ही टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 8:00 AM

‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता रणदीप हुड्डाचा आज वाढदिवस.

ठळक मुद्दे अभिनयात येण्यापूर्वी रणदीपने ड्रायव्हर, वेटरचेही काम केले. मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज रेस्तरॉमध्ये रणदीपने वेटर होता.

‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता रणदीप हुड्डा आज (20 ऑगस्ट) वाढदिवस. सन 1975 मध्ये आजच्याच दिवशी हरियाणाच्या रोहतकमध्ये रणदीपचा जन्म झाला होता. फार कमी काळात रणदीपने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 

 2001 मध्ये मीरा नायर यांच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण यानंतर सलग चार वर्षे रणदीपला कुणीही काम देईना. यानंतर 2005 मध्ये रामगोपाल वर्मा यांनी त्याला आपल्या ‘डी’ चित्रपटासाठी साइन केले आणि यानंतर रणदीपने कधीच मागे वळून पाहिले नाही.

करावी लागली होती एचआयव्ही टेस्ट

रणदीपचा ‘जिस्म 2’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. याच चित्रपटातून सनी लिओनीने बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील सनी व रणदीपच्या बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा झाली होती. ऐकून आश्चर्य वाटेल पण, पूजा भट्ट दिग्दर्शित या चित्रपटासाठी रणदीपला एचआयव्ही टेस्ट करावी लागली होती. होय, हा चित्रपट साईन करण्यापूर्वी सनीने आपल्या को-स्टारची एचआयव्ही टेस्ट व्हावी अशी अट ठेवली होती. अशी अट ठेवणारी ती बॉलिवूडची पहिली अभिनेत्री होती. ज्या अ‍ॅक्टरसोबत मी लव्ह मेकिंग सीन देणार तो, पूर्णपणे फिट असावा, ही खात्री सनीला हवी होती. याचमुळे सनीने रणदीपचे मेडिकल सर्टिफिकेट मागितले होते. त्यानुसार, रणदीपने हा चित्रपट साईन करण्यापूर्वी एचआयव्ही टेस्ट केली होती.

 बळजबरीने घेतले होते अभिनेत्रीचे चुंबन

‘दो लफ्जो की कहानी’ या चित्रपटावेळी रणदीप हुड्डा एका वादात अडकला होता. होय, या चित्रपटाची अभिनेत्री काजल अग्रवाल हिने रणदीप हुड्डावर बळजबरीने किस केल्याचा आरोप केला होता. या सिनेमातील काजल आणि रणदीप हुड्डाचा लिपलॉक सीन चांगलाच गाजला होता. काजलच्या काहीही ध्यानीमानी नसताना रणदीपने अचानक येत तिचे चुंबन घेतले होते. काजल यासाठी तयार नव्हती.  यामुळे ती चांगलीच भडकली झाली होती. शिवाय रागारागात शूटिंग सोडून ती निघून गेली होती. त्यानंतर स्क्रिप्टची गरज म्हणून हा सीन पूर्ण केला होता.  

 अभिनयात येण्यापूर्वी रणदीपने ड्रायव्हर, वेटरचेही काम केले. मेलबर्नमध्ये बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना एका चायनीज रेस्तरॉमध्ये रणदीपने वेटर होता. या काळात कार वॉशिंगचेही काम त्याने केले. दोन वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम केले. २००० मध्ये रणदीप भारतात परतला, तो अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊनच. भारतात रणदीपने प्रायव्हेट एयरलाइनमध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये काम केले आणि सोबतच मॉडलिंगही सुरु केले. मॉडेलिंग करता करता अभिनेता बनण्यासाठी तो संघर्ष करत राहिला.

टॅग्स :रणदीप हुडा