Join us  

 Childhood To College Time : बर्थ डे बॉय वरूण धवनचे हे फोटो पाहून व्हाल थक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 9:50 AM

Happy Birthday Varun Dhawan : आज वरूणचा वाढदिवस

ठळक मुद्देसुरूवातीला एक चॉकलेट हिरो अशीच वरूणची ओळख होती. पुढे ‘बदलापूर’ या चित्रपटातून वरूणने या प्रतिमेला छेद दिला.

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि लाली धवन यांचा मुलगा हीच वरूण धवनची ओळख नाही. तर आजघडीला नव्या पिढीचा सुपरस्टार अशी वरूणची नवी ओळख आहे. ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक ते सुपरस्टार अभिनेता हा वरूणचा प्रवास थक्क करणारा आहे. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली. एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देत, ए लिस्ट स्टार्समध्ये स्वत:चे नाव नोंदवले. आज (२४ एप्रिल ) वरूणचा वाढदिवस. तेव्हा बघुयात वरूणचे बालपण ते कॉलेजपर्यंतचे काही खास फोटो...

 २४ एप्रिल १९८७ रोजी वरूणचा जन्म झाला. नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमध्ये त्याने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले.

 २०१० मध्ये आलेल्या ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याने सहायक दिग्दर्शकाचे काम केले.

 लहानपणी वरूण अतिशय मस्तीखोर होता. इतका की, त्यालाला शिस्त लावण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना खूप मेहनत घ्यावी लागली.

वरुणने अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. पण वरूणचा डेब्यू होम प्रॉडक्शनद्वारे न होता त्याने स्वबळावर चित्रपटसृष्टीत नाव कमवावे अशी वरुणचे वडील डेव्हिड धवन यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा वरूणने पूर्ण केली.

 

वरूणने ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. लेकाच्या या पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वडील डेव्हिड धवन कधीही त्याला सेटवर भेटायला गेले नाहीत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाची एकही फ्रेम त्यांनी पाहिली नाही.

 वरूण गोविंदाचा खूप मोठा फॅन आहे. सलमान खानचाही तो खूप मोठा चाहता आहे.

 सुरूवातीला एक चॉकलेट हिरो अशीच वरूणची ओळख होती. पुढे ‘बदलापूर’ या चित्रपटातून वरूणने या प्रतिमेला छेद दिला. यात ४० वर्षांच्या रघूची भूमिका साकारून वरूणने तो गंभीर भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावू शकतो, हे सिद्ध केले.

 ‘बदलापूर’ चित्रपटातील रघूची व्यक्तिरेखा साकारताना वरूणने स्वत:ला जणू जगापासून तोडले होते. यादरम्यान तो प्रचंड एकल कोंडा झाला होता. यामुळे चिंतीत झालेली त्याची आई वरुणच्या मित्रांकडे त्याच्या खुशालीची चौकशी करत असे.

टॅग्स :वरूण धवन