Join us  

कधीकाळी पाकिस्तानी मीडियात रंगल्या होत्या दीया मिर्झाच्या अफेअरच्या चर्चा, या क्रिकेटपटूसोबत जोडले होते नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 8:00 AM

आज दीयाचा वाढदिवस.

ठळक मुद्देदिया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते.

बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री दीया मिर्झाने स्वत:ला निर्मिती व सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. आज दीयाचा वाढदिवस. हैदराबादेत जन्मलेल्या दीयाने  कॉलेजमध्ये असताना मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून  काम केलेले आहे. याच काळात तिने मॉडेलिंग सुरु केले. 2000 मध्ये  फेमिना मिस इंडियाचा किताबावर नाव कोरल्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली आणि बॉलिवूडचे दरवाजे तिच्यासाठी खुले झालेत.

‘रहेना है तेरे दिल में’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात झाली. या चित्रपटानंतर ती दिवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दम, दस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.  गतवर्षी आॅगस्टमध्ये दीयाचा पती साहिल संघापासून घटस्फोट घेतला.  दीया केवळ चार वर्षांची असताना तिच्या आईवडिलांचाही घटस्फोट झाला होता.

म्हणून लावते सावत्र वडिलांचे नाव

दीया साडेचार वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर दोघांनी दुसरे लग्न केले. तिच्या आईने अहमद मिर्झासोबत दुस-यांदा लग्नगाठ बांधली होती. दीया आपल्या याच वडिलांचे नाव लावते.   दिया ९ वर्षांची असताना तिच्या पहिल्या वडिलांचे लग्न झाले. त्यानंतर तिच्या दुस-या वडिलांनी तिला स्वत:च्या मुलीसारखे वाढवले. त्यांनी कधीच तिच्या पहिल्या वडिलांची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळेच त्यांच्याबद्दल तिच्या मनात नेहमीच आदर असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. अफेअरच्या चर्चा

करिअरच्या एका टप्प्यावर एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबत दीयाचे नाव जोडले गेले होते. हा क्रिकेटपटू कोण तर शोएब अख्तर. पाकिस्तानी मीडियाने  दीया व शोएबच्या अफेअरची बातमी खरी असल्याचे सांगून खळबळ निर्माण केली होती. यानंतर दोघांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा रंगली होती. या चर्चांनी दीया चांगलीच वैतागली होती. शोएबसोबत आपला कुठलाही संबंध नाही, या सगळ्या अफवा असल्याचे सांगत तिने या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.

सलमानसोबतही जोडले गेले नाव

सलमान खान यांच्यासोबतही दीयाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी चर्चेत होत्या. सलमानसोबत दीयाने काही सिनेमात काम केले आहे. याचकाळात दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. यावर दीया व सलमानने अखेरपर्यंत मौन राखणे पसंत केले.

 पाच वर्षांची असताना घरून पळून गेली होती...

दीया पाच वर्षांची असताना घरून पळून गेली होती. एका मुलाखतीत खुद्द तिने हा खुलासा केला होता. वडील रागावल्यामुळे रागारागात ती घरातून निघून गेली होती. इकडे आईवडील दिवसभर तिला शोधत होते आणि ती नातेवाईकाच्या घरी मज्जा करत होती. 

अभिनेत्री ते सामाजिक कार्यकर्तीदिया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेल्या दिया अनेक एनजीओमार्फत काम करते. होईल तेवढी समाजाची सेवा करण्याचे व्रत तिने स्वीकारलेय.  आजवर तिने महिलांसाठी एचआयव्ही जागरूकता, कॅन्सरच्या रूग्णांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत.  नर्मदा बचाओ आंदोलनालाही तिने पाठिंबा दर्शवला होता.

टॅग्स :दीया मिर्झा