Birthday Special : अपयशाने कधीच खचला नाही हा स्टार; अक्षय खन्ना त्याचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 13:00 IST
अभिनेता अक्षय खन्ना याचा आज(२८ मार्च) वाढदिवस. लोकप्रीय अभिनेते विनोद खन्ना याचा मुलगा अशी ओळख घेऊन अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये ...
Birthday Special : अपयशाने कधीच खचला नाही हा स्टार; अक्षय खन्ना त्याचे नाव!
अभिनेता अक्षय खन्ना याचा आज(२८ मार्च) वाढदिवस. लोकप्रीय अभिनेते विनोद खन्ना याचा मुलगा अशी ओळख घेऊन अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये आला. आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये अक्षयने अनेक चित्रपटांत काम केले. पण अक्षयचे करिअर म्हणावे तसे बहरले नाही. यानंतर अक्षय अचानक बॉलिवूडमधून दिसेनासा झाला. पाच वर्षांच्या दीर्घ ब्रेकनंतर अक्षय ‘ढिशूम’ या चित्रपटातून पुन्हा परतला. यानंतर अगदी अलीकडे ‘मॉम’ आणि ‘इत्तेफाक’मध्ये तो दिसला. अक्षय खन्नाचा पहिला चित्रपट होता ‘हिमालय पुत्र’. पण हा चित्रपट पूर्णपणे फ्लॉप झाला. अक्षयचे पिता विनोद खन्ना हेच अक्षयच्या या चित्रपटाचे निर्माते होते. अक्षयने ना कुठला अॅक्टिंगचा क्लास लावला, ना चित्रपट पाहत सुटला. पण अक्षयने एक गोष्ट मात्र पक्की ठरवली होती. ती म्हणजे, त्याला आयुष्यात अभिनेताचं व्हायचेय. त्यामुळेच १८ वर्षांच्या वयातचं अक्षयने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. ‘हिमालय पुत्र’ या एका फ्लॉपनंतर अक्षय ‘बॉर्डर’मध्ये दिसला. अक्षयचा हा दुसरा चित्रपट मात्र कमालीचा हिट झाला. नाही म्हणायला या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ असे अनेक दिग्गज स्टार होते. पण अक्षय खन्नाचे काम सगळ्यांच्याच डोळ्यात भरले. यानंतर ‘मोहब्बत’,‘कुदरत’,‘लावारिस’ अशा अनेक चित्रपटात अक्षय झळकला. पण एकापाठोपाठ आलेले हे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत. १९९९ मध्ये ऐश्वर्या रायसोबतच्या ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाने अक्षयच्या करिअरला थोडा आधार दिला. हा चित्रपट फार चालला नाही. पण ऐश्वर्या व अक्षयची जोडी हिट ठरली. याच जोडीला घेऊन सुभाष घई ‘ताल’ घेऊन आलेत. या चित्रपटाने अक्षय पुन्हा प्रकाशझोतात आला. २००१ मध्ये आलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात अक्षयने आमिर खान, सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली आणि यातील त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांच्याच डोळ्यांत भरला. आपल्या करिअरमध्ये अक्षयने ‘हमराज’,‘हंगामा’,‘हलचल’,‘रेस’,‘गांधी- माय फादर’,‘मॉम’,‘इत्तेफाक’ अशा अनेक सिनेमात दिसला. ‘गांधी-माय फादर’ या चित्रपटात अक्षयने महात्मा गांधी यांचा मुलगा हरिलाल गांधी यांचे पात्र साकारले. ही भूमिका अक्षयच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील सगळ्यांत वाखाणली गेलेली भूमिका आहे. अक्षयने चाळीशी ओलांडलीय. पण अद्याप त्याने लग्न केलेले नाही. सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये अक्षयने एक खुलासा केला होता. मला माझ्यापेक्षा २७ वर्षांने मोठ्या जयललितांशी डेट करण्याची इच्छा होती, असे तो म्हणाला होता. जयललितांमध्ये असे खूप काही आहे, ज्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालोय, असे तो म्हणाला होता. अक्षयचा विवाह संस्थेवर विश्वास नाही. यापेक्षा तो लिव्ह इनवर विश्वास ठेवता. त्याच्यामते, लिव्ह इनमध्ये एकत्र राहण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नसते.ALSO READ : या कारणामुळे अक्षय खन्नाने आजवर केले नाही लग्नअक्षयने लग्न केलेले नाही. पण त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जुळले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या अनेक गर्लफ्रेन्डला अक्षयने डेट केले आहे. पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, टिष्ट्वंकल खन्ना आदींसोबत अक्षय खन्नाचे नाव जुळले. ऐश्वर्या रायसोबत त्याच्या डेटिंगच्या बातम्याही आल्या होत्या. अर्थात अक्षयने यावर कायम बोलणे टाळले.