Join us  

Birthday Special : 16 व्या वर्षी डेब्यू, 150 सिनेमे...! आता इतकी बदलली अभिनेत्री रती अग्निहोत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 8:00 AM

आज रतीचा वाढदिवस. एकेकाळी रती टॉपची अ‍ॅक्ट्रेस होती, आज ती कमालीची बदललीये. 

ठळक मुद्दे2015 मध्ये रतीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आणि यानंतर दोघांचे नाते संपुष्टात आले.

अभिनेत्री रती अग्निहोत्रीने शौकिन, स्वामी दादा, फर्ज और कानून यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण आजही रतीचे नाव आठवले की, आठवतो तो एकच सिनेमा. तो म्हणजे, ‘एक दुजे के लिये’.  हा रतीचा पहिला हिंदी चित्रपट होता. केवळ वयाच्या 16 व्या वर्षी रती बॉलिवूड चित्रपटात झळकली. पहिल्याच चित्रपटाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती.  आज हे सांगण्याचे कारण म्हणजे आज रतीचा वाढदिवस. एकेकाळी रती टॉपची अ‍ॅक्ट्रेस होती, आज ती कमालीची बदललीये. 

अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे रतीने अगदी लहानपणीच ठरवले होते. मग काय वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली. याचदरम्यान एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाने रतीला पाहिले आणि चित्रपटात काम करण्याविषयी विचारले. फक्त महिनाभर चित्रीकरण म्हटल्यावर रतीच्या वडिलांनी रतीला चित्रपटात काम करण्यास परवानगी दिली. पण या चित्रपटानंतर रतीकडे दिग्दर्शकांची रांग लागली.  केवळ तीन वर्षांत तिने 32 दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते.

1981 साली रतीचा ‘एक दुजे के लिये’ हा सिनेमा रिलीज झाला आणि रती एका रात्रीत स्टार झाली. याचदरम्यान रतीची ओळख बिझनेसमॅन अनिल विरवानीसोबत झाली. एका इव्हेंटमध्ये दोघे एकमेकांना भेटले आणि काहीच दिवसांत एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर या नात्याला दोघांच्याही कुटुंबाचा विरोध होता. हा विरोध झुगारून दोघांनी लग्न केले.

9 फेबु्रवारी 1985 रोजी रती व अनिल यांचे लग्न झाले. 1986 मध्ये रतीने मुलाला जन्म दिला. लग्नानंतर रतीने इंडस्ट्रीला रामराम ठोकला.  पण ज्या पती व संसारासाठी करिअर सोडले, त्याच पतीने आपला खरा चेहरा दाखवणे सुरु केले. 

लग्नानंतर 30 वर्षे रती चित्रपटांपासून दूर राहिली आणि एकदिवस अचानक पोलिस ठाण्यात पोहोचली. पती मारहाण व छळ करत असल्याची तक्रार तिने दाखल केली. रतीचा पती तिला प्रचंड मारहाण करायला. त्याच्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ती संपूर्ण घरात धावत सुटायची, असेही म्हटले जाते.

एका मुलाखतीत खुद्द रतीने पतीच्या अनन्वित छळाची कहाणी सांगितली होती. तीस वर्षे मी नव-याचा मार सहन केला. मी केवळ माझ्या मुलासाठी सगळे काही सहन केले. एक दिवस मी मार खात खात मरणार, असेच मला नेहमी वाटायचे, असे ती म्हणाली होती. अर्थात तिच्या पतीने हे सगळे आरोप नाकारले होते.

2015 मध्ये रतीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आणि यानंतर दोघांचे नाते संपुष्टात आले. सध्या ती आपल्या मुलासोबत राहते. 2001 मध्ये रतीने पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. कुछ खट्टी कुछ मीठी या चित्रपटात काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका तिने साकारली. यानंतर अनेक चित्रपटांत ती झळकली.

टॅग्स :रती अग्निहोत्री