Join us  

Birthday Special : आर. माधवन त्याच्याच विद्यार्थिनीवर झाला होता लट्टू, वाचा ही इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 11:47 AM

आर. माधवनची लव्ह स्टोरी इतरांपेक्षा हटके आणि इंटरेस्टिंग आहे. वाचा ही लव्ह स्टोरी

अभिनेता आर. माधवनचा जन्म 1 जून, 1970 साली जमशेदपूर येथे झाला आहे. फार कमी लोकांना माहित असेल की सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करण्यापूर्वी माधवनला आर्मीत रुजू व्हायचे होते. मात्र त्याच्या नशीबात काहीतरी वेगळेच लिहिले होते आणि तो अभिनेता बनला. त्याची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तो त्याच्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात लट्टू झाला होता. जी आज त्याची पत्नी आहे.

आर. माधवन आणि त्याची बायको सरिताची लव्हस्टोरी इतरांपेक्षा थोडीशी हटके आणि इंटरेस्टिंग आहे. माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्यूटिव्ह होते तर आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. अभ्यासात हुशार असलेल्या माधवनने त्यासोबत अनेक छंदही जोपासले होते. त्याला आर्मीमध्ये प्रवेश घ्यायचा होता मात्र त्याच्या पालकांनी त्याला मॅनेजमेंट स्टीडी करण्याचे सुचवले. इलेक्ट्रॉनिकची डिग्री घेतल्यानंतर माधवनने कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. याच क्लासमध्ये माधवन आणि सरिताची भेट झाली.

1991मध्ये सरिता एअरहोस्टेसच्या नोकरीची तयारी करत होती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लाससाठी ती त्यावेळी महाराष्ट्रात आली होती. सरिताची माधवनच्या क्लासमध्ये निवड झाली. त्यानंतर तिने त्याला खासगी भेटून माधवनचे आभार मानले आणि सोबतच तिने त्याला डिनरसाठी बोलवले.

आपल्या पहिल्या डेटबद्दल माधवन सांगतो, 'सरिता माझी स्टूडंट होती आणि तिनं मला डिनर डेटसाठी विचारलं. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी तिला त्याचवेळी प्रपोज केले आणि नंतर तिच्याशी लग्न केले.' 

आर. माधवन आणि सरिताने जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केले. त्यांचे लग्न तमीळ पद्धतीने झाले. या दोघांना आता वेदांत नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

टॅग्स :आर.माधवन