Birthday Special : मल्लिका शेरावतचे झाले होते लग्न, सध्या विदेशात बॉयफ्रेंडची संभाळते आहे लाखोंची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 14:28 IST
इम्रान हाश्मीसोबत मर्डर चित्रपटामध्ये दिलेल्या हॉट सीन्समुळे मल्लिका शेरावत चर्चेत आली. आज मल्लिकाचा 41 वा वाढदिवस आहे. मल्लिकाने आपल्या ...
Birthday Special : मल्लिका शेरावतचे झाले होते लग्न, सध्या विदेशात बॉयफ्रेंडची संभाळते आहे लाखोंची संपत्ती
इम्रान हाश्मीसोबत मर्डर चित्रपटामध्ये दिलेल्या हॉट सीन्समुळे मल्लिका शेरावत चर्चेत आली. आज मल्लिकाचा 41 वा वाढदिवस आहे. मल्लिकाने आपल्या बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती केप कापताना दिसते आहे. सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि मल्लिकाचे खरे नाम मल्लिका नसून रीमा लांबा आहे. बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर मल्लिकाने आपले नाव बदलले. मल्लिकाने हिंदी चित्रपटांशिवाय इंग्लिश आणि चायनीज चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केला आहे. मल्लिका खूप काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. एककाळ असा होती कि मल्लिकाकडे बॉलिवूडची सेक्स सिंबल म्हणून पाहिले जायचे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2003 मध्ये आलेल्या ख्वाहिश चित्रपटातून केली होती. मात्र मल्लिका प्रकाशझोतात आली ती मर्डर चित्रपटानंतर. त्यात तिने तब्बल 21 किसींग सीन्स दिले होते. मल्लिकाने लव्ह स्टोरीशिवाय कॉमेडी चित्रपटात देखील काम केले आहे. प्यार के साइड इफेक्ट्स, आपका सुरुर आणि डबल धमाल सारख्या कॉमेडी चित्रपटात ती झळकली होती. हॉलिवूडबाबत बोलायचे झाले तर मल्लिकाने हिस्स्स्स आणि पॉलिटिक्स ऑफ लव्ह या चित्रपटातदेखील काम केले आहे. मल्लिकाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. यादरम्यान तिची ओळख पायलट करण सिंग गिलसोबत झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले मात्र फारकाळ ही लग्न टिकले नाही. करण आणि मल्लिका लग्नाच्या एकवर्षनंतर एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर मल्लिका हरियाणासोडून मुंबईत आली. मल्लिकाला एक लहान मुलगासुद्धा आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाचा फोटो समोर आला होता. मात्र मल्लिकाने आपल्या लग्नाची गोष्ट कधीच स्वीकारली नाही. मल्लिकाने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिचे कुटुंबीय तिच्यावर नाराज झाले होते. मात्र त्यानंतर काहीकाळानंतर त्यांनी तिला स्वीकारले सुद्धा. सध्या मल्लिका एक फ्रेंच बिझनेसमनला डेट करते आहे. मल्लिकाच्या बॉयफ्रेंडचे नाव साइरिल ऑक्जेनफेंस आहे. मल्लिका आणि साइरिलची ओळख पॅरिसमध्ये झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करतायेत.