Join us  

- म्हणून विनोद खन्नांसोबत रोमॅन्टिक सीन्स द्यायला घाबरायच्या नट्या, डिंपल व माधुरीसोबत घडले होते असे काही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 8:00 AM

माधुरीच्या आयुष्यात सर्वात मोठा वाद उद्भवला होता तो तिच्या विनोद खन्ना यांच्यासोबतच्या हॉट किसिंग सीनमुळे.

ठळक मुद्दे विनोद खन्ना यांचा स्वत:वरचा ताबा सुटला. दिग्दर्शकांनी कट-कट म्हटले तरी ते डिंपलला किस करतच राहिले.

बॉलिवूड अभिनेते विनोद खन्ना आज आपल्यात नाहीत. पण त्यांची अदाकारी, त्यांचे सिनेमे कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतील. एकेकाळी चाहतेच नाही तर त्यांच्यासोबत काम करणा-या नट्याही विनोद खन्नांवर फिदा होत्या. जणू काही प्रत्यक्षात घडतेय, इतके तल्लीन होऊन विनोद खन्ना प्रत्येक सीन देत. पण नेमक्या याच कारणामुळे विनोद खन्ना वादातही अडकले. होय, रोमॅन्टिक सीन देताना विनोद खन्ना स्वत:वरचे नियंत्रण गमावून बसत. असे एकदा नाही तर दोनदा झाले होते. आज विनोद खन्ना यांचा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊ या हे दोन वादग्रस्त किस्से...

पहिला किस्सा डिंपल कपाडियासोबतचा. ‘प्रेम धरम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डिंपल आणि विनोद खन्ना यांच्यात एक इंटीमेट सीन्स शूट करायचा होता. या सीनमध्ये विनोद खन्ना यांना डिंपलला किस करायचे होते. ठरल्यानुसार सीन्सला सुरुवात करण्यात आली; मात्र विनोद खन्ना यांचा स्वत:वरचा ताबा सुटला. दिग्दर्शकांनी कट-कट म्हटले तरी ते डिंपलला किस करतच राहिले. त्यांना स्वत:ला थांबविणे शक्य झाले नाही. इतके की, शेवटी दिग्दर्शकांनाच धाव घेत विनोद खन्ना यांना बाजूला सारावे लागले. हा संपूर्ण प्रसंग डिंपल यांच्यासाठी खूपच शॉकिंग होता.  

आधी विनोद खन्ना यांनी डिंपलला मिठी मारून किस करीत हा सीन पूर्ण केला होता. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक  महेश भट्टच्या या सीन्समुळे समाधान झाले नव्हते. त्यांनी यात आणखी इंटेसिटी आणण्यासाठी एक टेक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र विनोद खन्ना स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत, ते डिंपलला किस करीत राहिले.  महेश भट्ट सारखे कट-कट म्हणत होते. परंतु दोघांमधील अंतर अधिक असल्याने त्यांच्या कानावर भट्ट यांचा आवाज पोहोचलाच नाही. परंतु जेव्हा ही बाब विनोद यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेचच डिंपलची माफी मागितली. परंतु भडकलेल्या डिंपलने विनोद यांना माफ करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता.  विनोद खन्ना यांनी केलेल्या या प्रकारामुळे संतापलेल्या डिंपलने शूटिंगला स्पष्ट शब्दात नकार दिला. जेव्हा महेश भट्ट यांनी डिंपलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते नशेत असल्याची माहिती समोर आली होती.  त्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली गेली. मात्र अशातही डिंपलचा संताप कमी झाला नव्हता. अखेर हा चित्रपट रिलीजच होऊ शकला नाही. त्यानंतर या चित्रपटाचे नाव बदलून शूटिंग पूर्ण करण्यात आले. १९९२ मध्ये हा चित्रपट थेट होम व्हिडीओमध्ये रिलीज केला गेला. 

पुढे ‘दयावान’च्या शूटींगवेळी असेच घडले. माधुरीसोबत इंटिमेट सीन्स देताना विनोद इतके अनियंत्रित होत की, त्यांना सांभाळणे कठीण होऊन जाई. एक चुंबन दृश्य शूट करताना विनोद यांनी माधुरीच्या ओठांना चावा घेतल्याची चर्चाही त्यावेळी होती. या किसींग सीन्ससाठी माधुरीला बरीच टीका सहन करावी लागली होती. 

टॅग्स :विनोद खन्ना