BIRTHDAY SPECIAL: ‘मोस्ट स्टायलिश स्टार’ सिद्धार्थ मल्होत्राकडून शिका स्टाईलमध्ये कसे राहायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 12:18 IST
सिद्धार्थ मल्होत्राला इंडस्ट्रीमध्ये येऊन बघता बघता पाच वर्षे होत आली आहेत. ‘स्टुडंट आॅफ द इयर’मधून त्याने चंदेरी दुनियेत पहिले ...
BIRTHDAY SPECIAL: ‘मोस्ट स्टायलिश स्टार’ सिद्धार्थ मल्होत्राकडून शिका स्टाईलमध्ये कसे राहायचे
सिद्धार्थ मल्होत्राला इंडस्ट्रीमध्ये येऊन बघता बघता पाच वर्षे होत आली आहेत. ‘स्टुडंट आॅफ द इयर’मधून त्याने चंदेरी दुनियेत पहिले पाऊल ठेवले आणि तेव्हापासून मागे वळून कधी पाहिलेच नाही. नव्या पीढीतील सर्वात स्टायलिश आणि टॅलेंटेड स्टार म्हणून त्याने ओळख कमावलेली आहे.आपल्या या लाडक्या सिद्धार्थचा वाढदिवस आहे. १६ जानेवारी १९८५ रोजी त्याचा जन्म झाला होता. म्हणजे आज तो ३२वा बर्थडे सेलिब्रेट करीत आहे. ‘हसी तो फंसी’, ‘एक व्हिलन’, ‘ब्रदर्स’, ‘कपूर अँड सन्स’ यासारख्या एकाहून एक चांगल्या चित्रपटातून त्याने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.कोणाच्या पाठिंब्याशिवाय दिल्लीहुन मुंबईत आल्यावर सिद्धार्थने स्वत:च्या हिंमतीवर आपले स्थान मजबुत केले. ‘डेल्ही बॉय’ ते ‘मुंबई सुपरस्टार’ होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास नवअभिनेत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. सध्या आलिया भट्टशी असणाऱ्या अफेयरमुळे तो चर्चेत आहे. आजच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये आलिया सहभागी होणार का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी जवळच्या मित्रमंडळीसोबत सिद्धार्थ जम के पार्टी करणार असल्याचे सांगण्यात येतेय.चित्रपट, अभिनय आणि आलियामुळे नेहमी चर्चेत राहणारा सिद्धार्थ त्यांच्या अल्टीमेट स्टाईलसाठीदेखील ओळखला जातो. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर तो आपल्या चार्मिंग लूकमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. न्यूझीलंड पर्यटनाचा आॅफिशियल ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यानंतर तो तेथे सुटीसाठी गेला होता. यावेळी त्याने घातलेले कपडे आणि एकंदर स्टाईलवरून प्रवासात फॅशनेबल कसे राहावे याचा वस्तूपाठच त्याने घालून दिला आहे.त्याच्या न्यूझीलंड टूरवरील बेस्ट १० स्टाईल्सची आम्ही तुम्हाला झलक दाखवत आहोत. ती पाहुन तुम्हीसुद्धा म्हणाल बार बार देखो! * मॅन इन ब्लॅक : काळ्या रंगाचे ब्लेझर, टी-शर्ट, डेनिम आणि स्टायलिश डिझाईनर शूट असा त्याचा एकमद कूल ‘आॅल ब्लॅक’ लूक आहे. मागे नयनरम्य नजारा आणि डोळ्या वर ‘काला चष्मा’ म्हणजे क्या बात है!
* बॉय इन ब्ल्यू : बोटिंगचा आनंद लुटताना त्याने घातलेले निळ्या रंगाचे सुपरड्राय जॅकेट, टी-शर्ट, चिनोज् आणि स्नीकर्स असा सगळा ब्ल्यू लूक त्याला शोभून दिसत आहे.
* कॅज्युल सिद्धार्थ : दिवसाची सुरुवात अशी अल्हाददायक करण्यासाठी लाल रंगाचे ट्रेंडी जॅकेट, काळी डेनिम, गे्र टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज एकदम बेस्ट पर्याय आहे.
* परंपरेतही मॉडर्न स्टाईल : न्यूझीलंडच्या पारंपरिक संस्कृतित रमलेल्या सिद्धार्थने फॅशन सेन्स मात्र मॉडर्न ठेवला आहे. गौरव कान्हिजोने डिझाईन केले लाईट पिंक/मरून लाँग जॅकेट, काळ्या रंगाचा टर्टल नेक टी-शर्ट, डेनिम आणि स्नीकर्समध्ये सिद्धार्थ उठून दिसतोय.
* स्पोर्टिंग लूक : अँडव्हेंचरपूर्ण राहिलेल्या या ट्रिपमध्ये सिद्धार्थने खऱ्या अर्थाने मजा केली. टी-शर्टवर स्पोर्ट्स जॅकेट, आॅलिव्ह ग्रीन रंगाची कार्गो पँट आणि स्पोर्ट्स शूजने तर कॅज्युअल स्टाईलला आणखी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
* फ्लार्इंग हाय : न्यूझीलंडच्या निसर्गरम्य सौंदर्याचा हवेतून आस्वाद घेण्यासाठी त्याने हेलिकॉप्टर राईड केली. यावेळी त्याने रिस स्वेटरवर सिलेक्टेड हॉम जॅकेट आणि अरमानी जीन्स घातली होती.
* हॉट, हॉटर, हॉटेस्ट : न्यूझीलंड क्रि केट प्लेयर ब्रेंडेन मॅक्युलम आणि स्टीफन फ्लेमिंगसोबत गरमा गरम कॉफीचा आनंद लुटाताना सिद्धार्थचा हॉट लूक कसा काय लपून राहत नाही. टॉमी हिलफिगर जॅकेट आणि ओन्ली अँड सन्स टी-शर्टमध्ये तो क्युट दिसतोय.
* मॉडर्न मॅन : बरबेरी कोट, टॉमी हिलफिगर शर्ट, डेनिम, स्नीकर्स आणि त्यावर शेड्स घातलेला सिद्धार्थ पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना ट्रीट आहे.
* ट्रेन जर्नी लूक : लाँग कोट, क्रीम जीन्स, टी-शर्ट, पांढरे शूज आणि स्कार्फ थंडीसाठी परफेक्ट लूक आहे.
cnxoldfiles/strong> यापेक्षा हॉट फोटो असू शकतो का? डिझन डेनिम, टी-शर्ट, सुपरड्राय जॅकेट, रायडिंग शूज घालून स्टायलिश बाईकवर राईडसाठी सिद्धार्थ एकदम तयार आहे.