Join us  

Birthday Special : १३ वर्षांच्या मुलीवर भाळला होता जॅकी श्रॉफ; वाचा, ‘जग्गू दादा’ची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 5:48 AM

बॉलिवूडमध्ये ‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ याचा आज (१ फेब्रुवारी) वाढदिवस. जॅकीची प्रोफेशनल लाईफ जितकी मजेशीर ...

बॉलिवूडमध्ये ‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ याचा आज (१ फेब्रुवारी) वाढदिवस. जॅकीची प्रोफेशनल लाईफ जितकी मजेशीर राहिली, तितकीच त्याची लव्ह लाईफही मजेशीर राहिली. जॅकीची लव्ह स्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.  त्याला ‘जग्गू दादा’  हे नाव कसे पडले, याची कहानीही तितकीच इंटरेस्टिंग आहे. केवळ इतकेच नाही तर त्याच्या मॉडेल आणि हिरो बनण्याची कथाही तितकीच रोचक आहे.  जॅकीचे पूर्ण नाव जयकिशन काकुभाई श्रॉफ असे आहे. महाराष्ट्रातील लातूर येथील उदगीर येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील काकुभाई हरिभाऊ श्रॉफ गुजराती होते. तर आई तुर्कस्थानी.असा झाला ‘जग्गू दादा’चा जन्म जॅकी मुंबईमध्ये मलबार हिल एरिया मध्ये तीन बत्ती भागात राहत होता. तुम्हा ऐकून आश्चर्य वाटेल पण अभिनेता आणि मॉडेल बनण्याआधी जॅकी त्या भागातला गुंड म्हणून ओळखला जायचा. जग्गू दादा म्हणून लोक त्याला ओळखायचे. जॅकीने यामागची कहानी एकदा सांगितली होती. माझा भाऊ आमच्या वस्तीतचा खरा दादा होता.  तो सर्वांची मदत करायचा. एकेदिवशी  कुणाला तरी वाचवण्यासाठी पोहता येत नसूनही तो समुद्रात उतरला आणि माझ्या डोळ्यांसमोर बुडाला. भावाच्या मृत्यूनंतर वस्तीच्या भल्यासाठी काम करायचे असे मी ठरवले आणि भावाची जागा घेतली. इथून जग्गू दादाचा जन्म झाला, असे त्याने सांगितले होते.अन् देवआनंद यांच्या नजरेत भरला जॅकीएकदिवस बस टॉपवर बसची प्रतीक्षा करीत असताना एका माणसाने जॅकीला मॉडेलिंग करणार का? असा प्रश्न केला. त्यावर  किती पैसे देणार, हा जॅकीचा पहिला प्रश्न होता. यानंतर जॅकी मॉडेलिंग करू लागला.  एक दिवस जॅकी देवआनंद यांच्या ‘स्वामी दादा’ या चित्रपटाचे शूटींग बघायला गेला. गर्दीत जॅकी उभा होता. पण गर्दीपेक्षा वेगळा दिसत होता. देवआनंद यांची नजर त्याच्यावर गेली आणि त्यांनी जॅकीला जवळ बोलवले.  एवढेच नाही तर त्याला एक लहानसा रोल आॅफर केला. अशाप्रकारे जॅकी मोठ्या पडद्यावर अवतरला. यानंतर नशीबाने जॅकीला अशीच एक मोठी संधी दिली. बड्या स्टार्सचे नखरे पाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी नवा चेहरा घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने जॅकीला ‘हिरो’ मिळाला. १९८३ मध्ये आलेल्या या चित्रपटाने जॅकीला खºया अर्थाने हिरो बनवले. सुभाष घई यांनीच जय किशन याला जॅकी  हे नाव दिले . इंटरेस्टिंग लव्हस्टोरीअभिनयाची कारकिर्दीत प्रसिद्धीच्या शिखरावर असताना जॅकीचे आयशा दत्त हिच्यावर प्रेम जडले. आयशा ही राजघराण्यातील आहे. जॅकी व आयशाची एका बसमध्ये नजरानजर झाली. तेव्हा आयशा केवळ १३ वर्षांची होती. पण अडचण ही होती की, जॅकी आधीच रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याची गर्लफ्रेन्ड शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. मग काय, आयशानेच पुढाकार घेतला आणि जॅकीच्या त्या गर्लफ्रेन्डला एक पत्र लिहिले. या पत्राने आयशा व जॅकीचा मार्ग मोकळा झाला. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ५ जून १९८७ रोजी जॅकी व आयशा विवाहबंधनात अडकले. आयशा लग्नानंतर चित्रपट निर्माती बनली. ALSO READ : 'त्या' रात्री जॅकी श्रॉफने केला होता तब्बूवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ? जॅकीला दोन मुले आहेत. एक बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि मुलगी कृष्णा. चर्चा खरी मानाल तर जॅकीसोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर आयशा व साहिल खान यांचेही अफेअर होते. २००९ मध्ये साहिलसोबत मिळून आयशाने एक प्रॉडक्शन कंपनी सुरु केली होती. याचदरम्यान दोघे जवळ आले होते, असे मानले जाते. कालांतराने साहिल व आयशाचे आर्थिक व्यवहारावरून बिनसले. पुढे दोघांनीही एकमेकांवर बरेच आरोप केले होते. मी आयशासोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होतो, असा दावा साहिलने केला होता. याऊलट आयशाने साहिलवर ८ कोटी रूपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. साहिल गे आहे आणि म्हणून त्याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला, असेही आयशाने म्हटले होते. अर्थात या एपिसोडने श्रॉफ कुटुंबावर कुठलाही फरक पडला नाही. जॅकीने आपल्या पत्नीला कायम सोबत केली.