Join us  

birthday special: नम्रता शिरोडकरच्या आयुष्यातील ‘महेश’ची इंटरेस्टिंग स्टोरी! तुम्हीही वाचा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 11:00 AM

एकेकाळी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी‘मिस इंडिया‘ नम्रता शिरोडकर हिचा आज (२२ जानेवारी)वाढदिवस. नम्रता आज बॉलिवूडपासून दूर आहे. पण  बॉलिवूडचा ...

एकेकाळी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी‘मिस इंडिया‘ नम्रता शिरोडकर हिचा आज (२२ जानेवारी)वाढदिवस. नम्रता आज बॉलिवूडपासून दूर आहे. पण  बॉलिवूडचा एककाळ तिने चांगलाच गाजवला होता. नम्रताच्या वाट्याला फार चित्रपट आले नाहीत. पण जे काही आलेत, त्या चित्रपटांतील नम्रताच्या अभिनयाचे वारेमाप कौतुक झाले. पुढे नम्रता तिच्या महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली. पण हीच नम्रता पुढे महेश मांजरेकर नाही तर महेशबाबूसोबत संसार थाटून  मोकळी झाली.होय, नम्रताची लव्ह स्टोरी प्रचंड इंटरेस्टिंग आहे. नम्रताच्या आयुष्यात दोन पुरूष आलेत आणि तेही एकाच नावाचे. दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या नम्रताच्या नात्याची त्याकाळात बरीच चर्चा रंगली होती. अर्थात नम्रता व महेश मांजरेकर या दोघांपैकी कुणीही हे नाते मान्य केले नाही. पण म्हणून ते लपूनही राहिले नाही. अर्थात हे नाते फार काळ टिकले नाही. म्हणजेच, हे नाते अल्पजीवी ठरले. पण या अल्पजीवी नात्यानंतर नम्रताच्या आयुष्यात साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याची एन्ट्री झाली आणि नम्रताने महेशबाबूसोबत लग्नाचा निर्णय घेतला.सन २००० मध्ये नम्रता ‘वामसी’ या तेलगू चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होती. याच चित्रीकरणादरम्यान तिची महेशबाबूशी ओळखझाली होती. ही ओळख नंतर मैत्रीत बदलली आणि पुढे प्रेमात. नम्रता व महेशबाबू लग्नापूर्वी उणेपुरे चार वर्षे एकमेकांना डेट करत होते. यानंतर फेबु्रवारी २००५ मध्ये नम्रता व महेशबाबूने लग्नाचा निर्णय घेतला. आता नम्रता व महेशबाबूच्या संसारवेलीवर दोन फुले फुलली आहेत. या दोघांची दोन मुले आहेत. मुलगा गौतम आणि मुलगी सितारा.१९९३ मध्ये नम्रताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला. यानंतर मॉडेलिंगची तिची कारकिर्द प्रचंड यशस्वी ठरी. यापश्चात नम्रताने मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. यात ती पाचव्या क्रमांकावर राहिली. मिस एशिया पॅसिफिक स्पर्धेतही ती पहिली रनरअप ठरली. १९९८ मध्ये सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटामधून नम्रताने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर  पुकार , वास्तव , हेराफेरी , अस्तित्व , कच्चे धागे , तेरा मेरा साथ रहे  आणि  एलओसी: कारगिल अशा अनेक हिट सिनेमांत नम्रता दिसली. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर नम्रता दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळली आणि याच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नम्रताला तिचा जोडीदार मिळाला.