Birthday special : इम्रान हाश्मीला 'या' क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचेय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 12:41 IST
सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणार अभिनेता इम्रान हाश्मीचा आज 39वा वाढदिवस आहे. इम्रानचा जन्म 24 मार्चला उत्तरप्रदेशमधील कन्नौजमध्ये झाला. ...
Birthday special : इम्रान हाश्मीला 'या' क्रिकेटरच्या बायोपिकमध्ये करायचेय काम
सिरीयल किसर म्हणून ओळखला जाणार अभिनेता इम्रान हाश्मीचा आज 39वा वाढदिवस आहे. इम्रानचा जन्म 24 मार्चला उत्तरप्रदेशमधील कन्नौजमध्ये झाला. इम्रान हा अभिनेते अनवर हाश्मी यांचा मुलगा आहे. इम्रानची आई माहिरा हाश्मी या दिग्दर्शक महेश भट्ट यांची बहिण आहे. महेश आणि मुकेश भट्ट हे नात्याने इम्रानचे मामा आहेत. इम्रानने लहानपणी आपले नाव बदलून फरहान केले होते मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांने परत आपले नाव इम्रान केले. इम्रानने आपले शिक्षण मुंबईतल्या सिडनहम कॉलेजमधून पूर्ण केले. 2003 मध्ये आलेल्या विक्रम भट्ट यांच्या फुटपाथ चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 2008 मध्ये आलेला जन्नत चित्रपट सुपरहिट ठरला. इमरानने 'सीरिअल किसर' म्हणून इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. 'मर्डर' चित्रपटातील त्याची भूमिका आजही लक्षात आहे. त्यामुळेच 'किसिंग हिरो' म्हणून त्याला ओळखलं जावू लागलं.इम्रानने 2006 मध्ये परवीन शहानीशी मुस्लीम पद्धतीने विवाह केला.इमरानच्या स्ट्रगलच्या काळात ती नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे. २०१०मध्ये त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव अयान असून काही वर्षांपूर्वी अयानला कर्करोग असल्याचे निदान झाले होते. अयानच्या आजारपणात इम्रान आणि परवीनने हार न पत्करता त्याच्या आजारपणाला तोंड दिले. आज अयान पूर्णपणे बरा झाला आहे. इम्रानने अयानच्या कॅन्सरशी लढताना आलेले अनुभव ‘किस आॅफ लाईफ- हाऊ अ सुपर हिरो अॅन्ड माय सन डिफीटेड कॅन्सर' या पुस्तकात मांडले होते. बिलाल सिद्दीकी हा इम्रानचा मित्र या पुस्तकाचा सहलेखक आहे.इम्रानने क्रिकेटर अजहरुद्दीनच्या बायोपिकमध्ये काम केले होते. त्यानंतर त्याला युवराज सिंगचा बायोपिक तयार झाला तर त्यातदेखील काम करण्याची इच्छा आहे. शेवटचा इम्रान अजय देवगणच्या 'बादशाहो'मध्ये दिसला होता. या चित्रपटांने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गला जमावला होता. यानंतर इम्रानचे फॅन त्याच्या आगामी चित्रपटाची नक्कीच वाट पाहत असतील.