Join us  

Birthday Special: ‘कयामत से कयामत तक’ नाही तर ‘हा’ आहे जुही चावलाचा बॉलिवूड डेब्यू सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 8:30 AM

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिचा आज (१३ नोव्हेंबर)  वाढदिवस आहे. १३ नोव्हेंबर १९६७ रोजी अंबाला (हरियाणा) येथील आर्मी कुटुंबात ...

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिचा आज (१३ नोव्हेंबर)  वाढदिवस आहे. १३ नोव्हेंबर १९६७ रोजी अंबाला (हरियाणा) येथील आर्मी कुटुंबात जुहीचा जन्म झाला. तिच्या आईचे नाव मोना चावला आणि वडिलांचे नाव डॉ. एस. चावला होते. आज हे दोघेही हयात नाहीत. जुहीच्या जन्माच्या काही वर्षांनंतर तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ११ वर्षांची असताना जुहीला एक मॉडेलिंग असाईमेंट मिळाली होती. याच्या मानधनापोटी तिला १ हजारू रुपए मिळाले होते. ही जुहीची पहिली कमाई होती. हे पैसे जुहीने आपल्या आईला दिले होते. ते पाहून तिची आई कमालीची भावूक झाली होती.जुहीने मुंबईतील सिडेनहम कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. १०८४साली जुहीने मिस इंडियाच्या किताबावर आपले नाव कोरले. याचवर्षी झालेल्या मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत बेस्ट कॉश्च्युमचा अवॉर्ड तिने मिळवला.‘कयामत से कयामत तक’ या सिनेमाद्वारे जुहीने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी जुहीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. खरे तर ‘कयामत से कयामत तक’ हाच जुहीचा डेब्यू सिनेमा असे अनेकांना वाटते. पण नाही. १९८६ मध्ये आलेला ‘सल्तनत’ हा जुहीचा डेब्यू सिनेमा होता. यात तिने जरीनाची भूमिका साकारली होती. अर्थातच हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर जुहीने साऊथचा दिग्गज दिग्दर्शक रविचंद्रन यांच्या ‘प्रेमलोका’मध्ये काम केले. हा चित्रपट मात्र सुपरडुपर हिट ठरला होता. यापश्चात तिचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट आला. यात जुही आमिर खानसोबत दिसली होती.त्यानंतर तिने ‘स्वर्ग’, ‘आइना’, ‘लुटेरा’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ या सिनेमात  ती दिसली. ‘हम है राही प्यार के’ या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ALSO READ : ​जय मेहतासोबत लग्न करण्याआधी या अभिनेत्यासोबत जुही चावलाचे झाले होते लग्नशंभरहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणा-या जुहीचे लग्न बिझनेसमन जय मेहतांसोबत झाले असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जुहीने निर्माती म्हणूनसुद्धा काम केले आहे. ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘चलते चलते’ आणि ‘अशोका’ या सिनेमांची ती निर्मिती आहे.