Birthday Special : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची ‘बेफिक्रे’ गर्ल वाणी कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 15:57 IST
अभिनेत्री वाणी कपूर हिचा आज (२३ आॅगस्ट) वाढदिवस. टुरिज्ममध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर वाणीने हॉटेल इंडस्ट्री ज्वॉईन केली. पण हॉटेलमध्ये काम ...
Birthday Special : बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची ‘बेफिक्रे’ गर्ल वाणी कपूर!
अभिनेत्री वाणी कपूर हिचा आज (२३ आॅगस्ट) वाढदिवस. टुरिज्ममध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर वाणीने हॉटेल इंडस्ट्री ज्वॉईन केली. पण हॉटेलमध्ये काम करत असतानाच वाणीला मॉडेलिंगच्या आॅफर मिळू लागल्या आणि पुढे मॉडेलिंग करता करता ती चित्रपटात आली. अर्थात अद्यापही वाणीला बॉलिवूडमध्ये पाहिजे तसे यश मिळवता आले नाही, मात्र चित्रपटांत किसींग सीन्स देऊन वाणीने प्रसिद्ध मात्र मिळवली. वाणीचा जन्म २३ आॅगस्ट १९८८ रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील शिव कपूर हे फर्निचर एक्सपोर्टचा बिझनेस करतात. तिची आई डिम्पी कपूर शिक्षिका होती. पण आता ती मार्केटींग एक्झिक्युटीव्ह आहे. वाणीची एक मोठी बहीणही आहे. लग्नानंतर ती हॉलंडला सेटल झालीय. वाणीने बॉलिवूडमध्ये जावे, यास तिच्या वडिलांचा नकार होता. मात्र एलाईट मॉडेल मॅनेजमेंटसोबत मॉडेलिंग प्रोजेक्ट साईन केल्यानंतर वाणीने बॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत वाणी यावर बोलली होती. माझ्या वडिलांना माझ्या अभिनेत्री बनण्याचा निर्णय मान्य नव्हता. मुलींनी लवकर लग्न करून संसारात रमावे, असा त्यांचा विचार होता. माझ्या मोठ्या बहिणीचे वयाच्या केवळ १८ व्या वर्षी लग्न झाले. पण मला माझे निर्णय स्वत: घ्यायचे होते. आईने मला सोबत दिली. शेवटी आईच्या मदतीने वडिल तयार झाले, असे तिने सांगितले होते. मॉडेलिंग सुरु असतानाच यशराज बॅनरच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटासाठी आॅडिशन सुरु असल्याचे वाणीला कळले. ती या आॅडिशनसाठी गेली आणि तिचे सिलेक्शनही झाले. अर्थात या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत व परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये होते. यानंतर वाणीने ‘आहा कल्याणम’ या साऊथच्या चित्रपटात काम केले. पहिल्या डेब्यू सिनेमाच्या चार वर्षांनंतर वाणीला ‘बेफिक्रे’ हा यशराज बॅनरचाच दुसरा सिनेमा मिळाला. यात वाणीला लीड रोल मिळाला. रणवीर सिंह या आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधीही मिळाली. या चित्रपटात वाणीने अनेक किसींग सीन्स दिलेत. हा चित्रपट आपटला पण यातील किसींग सीन्सने वाणीला भलतीच प्रसिद्धी मिळवून दिली.