Join us  

Birthday Special : बिपाशा बासूला सतत वाटायची या गोष्टीची भीती! गुंडाच्या कॉलनीत घालवला स्ट्रगलचा काळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 10:40 AM

बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.

ठळक मुद्देगोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बॉलिवूडची ‘डस्की ब्युटी’ बिपाशा बासू हिचा आज (७ जानेवारी) वाढदिवस. मॉडेलिंगमध्ये यशस्वी करिअर केलेली बिपाशा बासू बॉलिवूडमध्ये आली आणि इथलीच बनून राहिली. जिस्म , राज , अजनबी आणि धूम यांसारख्या चित्रपटांत मादक रूपात दिसलेल्या बिपाशाने अनेक हिट सिनेमे दिलेत.

७ जानेवारी १९७९ रोजी दिल्लीत तिचा जन्म झाला. बिपाशाचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील नेहरु प्लेसस्थित एपीजे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय कोलकातामध्ये शिफ्ट झाले. गोदरेज सिंथॉल सुपरमॉडेल स्पर्धा आपल्या नावी केल्यानंतर १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये अजनबी या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये रिलीज झालेला राज हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००५ मध्ये आलेला नो एन्ट्री हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ ५५ सिनेमांमध्ये अभिनय केला. साधारण रूप घेऊन जन्मास आलेल्या बिपाशाने वयाच्या १६ वर्षीय मॉडेलिंग सुरु केली होती. याच वयात तिने गोदरेज सिंथॉल सुपर मॉडेल कॉन्टेस्ट जिंकला. यानंतर बिप्सने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट्स केल्यात आणि मग ती बॉलिवूडमध्ये आली. फिटनेस आणि अतिशय सेक्सी फिगरमुळे बिपाशा कायम बॉलिवूडचे डायरेक्टर्स आणि प्रोड्यूसरची आवडती राहिली. २०११ मध्ये टाइम्सली केलेल्या सर्वेक्षणात ५० मोस्ट डियायरेबल वूमनच्या यादीत बिपाशा आठव्या स्थानावर होती. २०१३ मध्ये या यादीत तिने सातवे स्थान मिळवले. यानंतर २००५ आणि २००७ मध्ये युकेच्या ईस्टर्न आय मॅगझिनने बिपाशाला मोस्ट सेक्सिएस्ट वूमन इन एशियाचा किताब देऊन गौरविले. बिपाशाने इंडस्ट्रीत एन्ट्री तर घेतली. पण सुरुवातीला कमी उंची आणि डार्क स्कीनमुळे चित्रपटसृष्टी आपल्याला स्वीकारणार की नाही, याची चिंता तिला सतत असायची. या एकाच गोष्टीची भीती तिला वाटायची.एका मुलाखतीत बिपाशाने आपल्या मनातील ही भीती बोलून दाखवली होती. ‘लहानपणी कुणीच मला पसंत करायचे नाही. अनेक जण तर मला ‘लेडी गुंड’ म्हणून हिणवायचे,’असे तिने सांगितले होते.

आपल्या स्ट्रगलच्या काळातबद्दलही तिने सांगितले होते. मी अमेरिकेतून भारतात आली, तेव्हा माझ्या आयोजकांनी कलिंगा कॉलनीच्या एका अपार्टमेंटमध्ये माझ्या थांबण्याची व्यवस्था केली होती. ही ट्रक डायव्हर्सची कॉलनी होती. मला त्या कॉलनीत प्रचंड भीती वाटायची. त्यामुळे मी पहाटेचं घर सोडायची. माझ्या जवळ मी नेहमी एक हत्यारही बाळगायची. पण सुदैवाने ते वापरण्याची गरज मला पडली नाही. पण एकदा रात्री उशीरा एका फॅशन शोवरून परतत असताना काही गुंडांनी माझ्या कारची पाठलाग केला होता. पण माझ्या कॅब ड्रायव्हरने लगेच कारचा वेग वाढवला व गुंडांना चकवा देत त्याने मला सुरक्षित घरी पोहोचवले. या घटनेनंतर मी ब्रीच कँडीस्थित एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले, असे ती म्हणाली होती.

टॅग्स :बिपाशा बासू