Join us  

Birthday Special : - तर अनुराग कश्यपच्या जिद्दीमुळे उद्धवस्त होऊ शकले असते या सिंगरचे करिअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:02 PM

बर्थ डे बॉय अनुराग कश्यप याने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. पठडीबाहेरचे चित्रपट देणारा दिग्दर्शक अशी अनुरागची ओळख आहे. त्यामुळे एकदा का इरेला पेटला की अनुराग कुणाचेही ऐकत नाही.

बर्थ डे बॉय अनुराग कश्यप याने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. पठडीबाहेरचे चित्रपट देणारा दिग्दर्शक अशी अनुरागची ओळख आहे. त्यामुळे एकदा का इरेला पेटला की अनुराग कुणाचेही ऐकत नाही. ‘देव डी’ या चित्रपटाबद्दलचा एक असाच किस्सा आहे. या चित्रपटातील ‘तौबा तेरा जलवा, तौबा तेरा प्यार...’ या गाण्याशी हा किस्सा संबंधित आहे.

होय, ‘देव डी’चे ‘इमोशनल अत्याचार’ हे गाणे तयार होत असताना सगळेच मनातून घाबरले होते आणि त्याला कारणही तसेच होते. हे गाणे गाणा-यास सिंगर बनायचे होते. ‘इमोशनल अत्याचार’ हे गाणे ऐकले की, ते कुण्या बँडने गायले असावे, असेच प्रारंभी वाटते. गुगलवरही अनेक ठिकाणी हे गाणे रंगीला व रसीला या बँडने गायले असल्याची माहिती मिळते. पण सत्य काही वेगळेच आहे.

इकतारा, तेरा रास्ता छोडंू ना, मनमर्जिया असे हिट साँग गाणारा सिंगर अमिताभ भट्टाचार्य आणिअमित त्रिवेदी या दोघांनी हे गाणे गायले आहे. अमित त्रिवेदीने या गाण्याबद्दलचा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले हाते की, अनुराग हे गाणे दोन कव्वाली सिंगरकडून रेकॉर्ड करू इच्छित होता. पण मी आणि अमिताभ भट्टाचार्य आम्ही दोघांनी या गाण्याची ट्रायल दिली. आमच्या आवाजातील गाणे अनुरागला  जाम आवडले आणि त्याने हे गाणे आमच्याच आवाजात रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला.

मला काहीच अडचण नव्हती. पण हे गाणे गाताना अमिताभ मात्र प्रचंड घाबरला होता. कारण तो आपल्या ख-या आवाजात गात नव्हता. त्याला सिंगर बनायचे होते. पहिल्याच गाण्यात असा खोटा आवाज आणि अशा गाण्याने आपला डेब्यू होत असेल तर भविष्यात कुणीच आपल्याला काम देणार नाही, अशी भीती त्याला होती. पण अनुराग अडून बसला होता. अखेर त्याच्या जिद्दीपुढे अमिताभचे काहीच चालले नाही आणि आम्ही हे गाणे एका वेगळ्या अंदाजात रेकॉर्ड केले. अर्थात हे गाणे हिट झाले आणि  अमिताभ भट्टाचार्यने सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :अनुराग कश्यप