Join us

बिप्सच्या चेहर्‍यावर दाग-धब्बे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:44 IST

बिपाशा बसुच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नुकतीच शूटिंगदरम्यान तिच्यासोबत एक अपघात घडला. ती सेटवर तयार होत होती. तेव्हा ...

बिपाशा बसुच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नुकतीच शूटिंगदरम्यान तिच्यासोबत एक अपघात घडला. ती सेटवर तयार होत होती. तेव्हा तिच्या हेयर स्टायलिस्टने एक गरम टोंग तिच्या अंगावर पाडला. त्यामुळे अनेक ठिकाणी तिचा चेहरा आणि हात जळाल्यासारखा झाला. तिने सोशल साईटवर चेहरा जळाल्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने ट्विटरवर पोस्ट के ले आहे की,' मी माझा दिवस शूटिंगपासून सुरू करणार होते. पण हेयरस्टायलिस्टमुळे माझ्या चेहर्‍यावर दाग धब्बे झाले. खुप आग आणि विद्रुप चेहरा पाहायला मला फारच भयावह वाटते आहे. ' ट्विट केल्यानंतर तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले. इंस्टाग्रामवर तिने नंतर फोटो पोस्ट केला. त्यात ती चेहरा लपवतांना दिसत आहे. तिच्यामागे जी हेयरस्टायलिस्ट उभी आहे ती नाही. जिच्यामुळे हा प्रकार घडला.