Join us

​ बिपाशाकडे ‘गोड बातमी’ नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 12:19 IST

होय, बॉलिवूडची हॉट बेब बिपाशा बसू ग्रोवर गर्भवती आहे, अशी चर्चा अलीकडे बॉलिवूडमध्ये रंगली होती. मात्र खुद्द बिपाशाने असे ...

होय, बॉलिवूडची हॉट बेब बिपाशा बसू ग्रोवर गर्भवती आहे, अशी चर्चा अलीकडे बॉलिवूडमध्ये रंगली होती. मात्र खुद्द बिपाशाने असे काहीही नसल्याचा खुलासा केला आहे. बिपाशा व तिचा लाडका हबी करणसिंह ग्रोवर दोघेही अलीकडे एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे दिसले होते. तर बिपाशा गेल्या काही महिन्यात अनेकदा रूग्णालयात दिसली. यावरून बिपाशाकडे ‘गुड न्यूज’ असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. मीडियात याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण बिपाशाने या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आज स्पष्ट केले. एका इंग्रजी संकेतस्थळास दिलेल्या मुलाखतीत बिप्सने हा खुलासा केला. माझ्या प्रेग्नंसीबद्दलच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. ही अफवा कशी व कुणी उडवली, मला ठाऊक नाही, असे बिप्स यावेळी म्हणाली. केवळ एवढेच नाही तर, आमच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय लोकांनी आमच्यावर सोपवावा,अशी विनंतीही तिने केली. बिपाशाच्या प्रवक्त्यानेही एक अधिकृत निवेदन जारी करून, बिपाशाच्या प्रेग्नंसीच्या चर्चेचे खंडन केले. ही अफवा आहे. बिपाशा व करण दोघेही सध्या जगभर फिरू इच्छितात. काम करू इच्छितात. आणखी काही काळ बाळाला जन्म देण्याबाबत त्यांची कुठलीही योजना नाही. बिपाशाने कधीच तिचे खासगी आयुष्य लपवलेले नाही. त्यामुळेच अशी गोड बातमी असेल तर ती सर्वांत आधी तिच्या चाहत्यांशी शेअर करेल, असे या निवेदनात म्हटले आहे.बिपाशा व करण या दोघांनी सुमारे वर्षभराच्या रिलेशनशिपनंतर गतवर्षी एप्रिल महिन्यात विवाह केला होता. ३० एप्रिल २०१६ रोजी बिप्स व करणचा विधिवत विवाह पार पडला होता. या लग्नाला बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. अलीकडे ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत बिप्स व करण दोघेही एकत्र दिसले होते.