Join us  

"मुलीच्या हृदयात दोन छिद्र..." लेकीच्या जन्मानंतरचा तो कठीण काळ आठवून बिपाशा झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2023 2:10 PM

तीन महिन्यांच्या चिमुकलीवर करावी लागती होती सर्जरी.

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. सध्या ती तिची फॅमिली लाईफ एन्जॉय करत आहे. काही महिन्यांपूर्वीच बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 'देवी' असं तिचं नामकरण करण्यात आलं. देवीच्या आयुष्यात आल्याने बिपाशा आणि पती करण ग्रोव्हर (Karan Grover) खूप आनंदित झाले. पण नुकताच बिपाशाने एक धक्कादायक खुलासा केला. देवीचा जन्म झाला तेव्हा तिच्या हृदयात दोन छिद्र होते. ती तीन महिन्याची असतानाच तिची सर्जरी करावी लागल्याचं बिपाशाने एका मुलाखतीत सांगितलं.

कालच बिपाशाने नेहा धुपियासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह संवाद साधला. यावेळी तिने मातृत्वाचे अनुभव शेअर केले. ती म्हणाली, 'आमचा प्रवास सामान्य पालकांपेक्षा खूप वेगळा होता. आता आमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय त्यापेक्षा तो काळ खूपच कठीण होता. कोणत्याही आईला या प्रसंगाचा सामना करावा लागू नये. मला मुलीच्या जन्मानंतर तिसऱ्या दिवशी समजलं की तिच्या हृदयात दोन छिद्र आहेत. मला वाटलं होतं की मी हे कुठेच सांगणार नाही पण अनेक मातांनी माझी या प्रवासात मदत केली म्हणून मी हे शेअर करत आहे.'

ती पुढे म्हणाली, 'मला आणि करणला खूप धक्का बसला होता. आम्ही याविषयी कुटुंबात कोणालाही सांगितलं नव्हतं. आम्हाला वीएसडी काय हे माहित नव्हतं. ही व्हेंट्रिक्युलर सेप्टल दोष आहे. आम्ही एका वाईट काळातून जात होतो. आम्ही कुटुंबासोबत यावर चर्चाही केली नाही. आम्ही एकदम ब्लँक झालो होतो. आम्हाला आनंद साजरा करायचा होता पण आमचं मन सुन्न झालं होतं. सुरुवातीचे पाच महिने खूप कठीण होते पण देवी पहिल्या दिवसापासूनच स्ट्राँग होती. '

देवीची तीन महिन्याच्या आत सर्जरी करावी लागणार होती. दर महिन्याला स्कॅन करुन बघावं लागत होतं की हे आपोआप बरं होतंय की नाही. मात्र छिद्र आणखी मोठं होत होतं. त्यामुळे सर्जरी करणं गरजेचंच होतं. तीन महिन्याच्या चिमुकलीची ओपन हार्ट सर्जरी कशी करु शकतात हा विचार करुनच आम्ही दु:खी व्हायचो. सर्जरी करायची ही मी मनाची तयारी केली मात्र करण यासाठी आधी तयार नव्हता.  शेवटी मनावर दगड ठेवून तो तयार झाला आणि देवीची सर्जरी ६ तास चालली. सर्जरी यशस्वी झाली, असंही ती म्हणाली.'

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हरपरिवारहॉस्पिटल