Join us  

बिपाशा बासूकडे आहे करण सिंग ग्रोव्हरपेक्षा कित्येक पटीने अधिक पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 2:03 PM

अलोन या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केले.

बिपाशा बासूने अजनबी, राज, जिस्म, जमीन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बिपाशा आणि जॉन अब्राहम यांची प्रेमकथा एकेकाळी मीडियात चांगलीच गाजली होती. ते दोघे लग्न करतील असेच सगळ्यांना वाटले होते. पण अचानक त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. जॉन प्रमाणेच डिनो मोरिया, राणा दग्गुबती यांसारख्या अभिनेत्यांसोबत देखील तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा झाली होती. 

अलोन या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू यांनी एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एप्रिल 2016 मध्ये त्या दोघांनी लग्न केले. बिपाशा ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी करणला बॉलिवूडमध्ये त्याचे प्रस्थ निर्माण करता आलेले नाही. त्याने दिल मिल गये, कसोटी जिंदगी की, कबूल है यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. बिपाशा आणि करण यांच्यात बिपाशा ही तीन वर्षांनी मोठी आहे. त्याचसोबत संपत्तीच्या बाबतीत देखील त्याच्यापेक्षा ती वरचढ आहे. बिपाशा आणि करणच्या संपत्तीचा विचार केला तर बिपाशाकडे करणपेक्षा सातपटींने अधिक संपत्ती असल्याचे म्हटले जाते. 

नेटवर्थियर या वेबसाईटच्या माहितीनुसार, बिपाशाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे तर करणकडे केवळ 13.4 कोटी इतकीच मालमत्ता आहे. बिपाशा आज चित्रपटांमध्ये खूप कमी काम करत असली तरी तरी ती अनेक चांगल्या ब्रँडसाठी जाहिरात करत असून याद्वारे ती चांगलाच पैसा कमावते. तसेच ती एक स्टेज शो करण्यासाठी दोन कोटी रुपये घेते. बिपाशाकडे अनेक महागड्या गाड्या असून मुंबईतील अतिशय पॉश एरियात तिची दोन घरं आहेत. याशिवाय कोलकतामध्ये देखील तिचे एक घर आहे. 

करण छोट्या पडद्यावर अनेक वर्षांपासून काम करत आहे. नेटवर्थियर या वेबसाईटनुसार तो मालिकेत काम करण्यासाठी एका दिवसाचे 80 हजार रुपये घेतो. त्याच्याकडे 13.4 कोटी इतकी संपत्ती आहे.  

टॅग्स :बिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हर