Join us

​जाहिरात शूट करता करता चक्क झोपी गेलेत बिपाशा अन् करणसिंह ग्रोवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 14:45 IST

एखाद्या बेडिंग एक्सेसिरीजची जाहिरात सुरु आहे आणि जाहिरात करणारे कलाकार चक्क बेडचे शूटींग करतात झोपी गेलेत? असे सांगितले तर ...

एखाद्या बेडिंग एक्सेसिरीजची जाहिरात सुरु आहे आणि जाहिरात करणारे कलाकार चक्क बेडचे शूटींग करतात झोपी गेलेत? असे सांगितले तर विश्वास बसेल? कदाचित नाही. पण असे घडलेय. तेही बिपाशा बसू आणि तिचा हँडसम हबी करण सिंह ग्रोवर यांच्यासोबत. होय, करण व बिपाशाने काल-परवा एका बेडिंग एक्सेसिरीजच्या जाहिरातीचे शूट केले. पण हे जाहिरात करताना दोघांनी दुप्पट वेळ घेतला. कारण मऊशार गादीची जाहिरात करता करता दोघेही चक्क झोपी गेले. हे खरे आहे का? असे बिपाशाला विचारले गेले. यावर तिने होकारार्थी उत्तर दिले. बिपाशा म्हणाली की, होय, ही जाहिरात करायला आम्हाला दुप्पट वेळ लागला. कारण जाहिरात करता करता आम्ही खरच झोपी गेलो होतो. शेड्यूल इतके बिझी असते की, झोपायला वेळच मिळत नाही. त्यामुळे शूटदरम्यान आम्हाला डोळे बंद करायला सांगितले गेले अन् आम्ही चक्क झोपी गेलो. आम्ही किती रिअ‍ॅलिस्टिक अ‍ॅक्टिंग करतोय, असेच आमच्या दिग्दर्शकाला वाटले. पण त्याला काय माहित, की आम्ही जाम थकलेलो होतो.ALSO READ : प्रेग्नंट आहे अभिनेत्री बिपाशा बासू?याठिकाणी करण व बिपाशाला झोप आणि व्यायाम याबद्दलदेखील विचारले गेले. यावर या दोन्ही गोष्टी आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. झोप आणि व्यायाम दोन्ही शरीरासाठी आवश्यक आहेत. पण बहुसंख्य लोक याकडे दुर्लक्ष करतात. आम्ही दोघेही दररोज किमान सहा तासांची झोप घेतो. कारण   योग आणि व्यायामासाठी पहाटे लवकर उठावे लागते. पण संधी मिळते तेव्हा आम्ही १२-१२ तासही झोपतो, असे त्यांनी सांगितले.मध्यंतरी बिपाशा प्रेग्नंट असल्याची खबर आली होती. याला कारणीभूत ठरला होता तिचा एक फोटो. या फोटोत ती तिच्या हँडबॅगने पोट लपवताना दिसली होती. त्यावरूनच ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.