Join us  

मोठी बातमी! २६ वर्षांनंतर नव्या रुपात भेटीला येणार DDLJ, आदित्य चोप्रा करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 11:10 AM

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ( DDLJ) २६ वर्षांनंतर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राचा रेकॉर्ड ब्रेक करणारा ब्लॉकबास्टर सिनेमा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ( DDLJ) २६ वर्षांनंतर नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शक म्हणून ब्रॉडवेमध्ये पदार्पण करणार आहे. १९९५ नंतर राज आणि सिमरनची लव्हस्टोरी ब्रॉडवे संगीताच्या रुपात क्रॉनिक केले जाणार आहे. आदित्य चोप्राने शनिवारी घोषणा करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. या प्रोजेक्टवर आदित्य चोप्रा मागील ३ वर्षांपासून काम करत आहेत.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमधील राज आणि सिमरनची लव्हस्टोरी एका संगीतमय नाटक म्हणजेच ब्रॉडवेच्या माध्यमातून रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे. कम फॉल इ लव्हः द डीडीएलजे म्युझिकलचा प्रीमियर अमेरिकेतील सैन डिएगोमधील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये होणार आहे.या ब्रॉडवेसाठी विशाल-शेखर संगीतकार म्हणून जोडले गेले आहेत. विशाल दादलानी आणि शेखर रावजियानी कंपोझर म्हणून काम करणार आहेत. आदित्य चोप्राने त्यांच्या या पहिल्या रंगभूमीवरील प्रस्तुतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध दिग्गज तांत्रिकांच्या टीमची निवड केली आहे. टोनी उर्फ एमी विनर रॉब ऐशफोर्ड (फ्रोजन, थॉरोली मॉडर्न मिली, द ब्वॉइज फ्रॉम सिरैक्युज) असोशिएट कोरियोग्राफर श्रुती मर्चंडसोबत या प्रोडक्शनची कोरियोग्राफी करणार आहे.

सप्टेंबर २०२२मध्ये होणार प्रीमियरकम फॉल इ लव्हः द डीडीएलजे म्युझिकल २०२२-२०२३मध्ये ब्रॉडवे सीझनमध्ये स्टेजवर सादर केले जाणार आहे.ज्याचा वर्ल्ड प्रीमियर सॅन डिएगोमधील ओल्ड ग्लोब थिएटरमध्ये सप्टेंबर २०२२ दरम्यान होणार आहे.आदित्य चोप्राचे म्हणणे आहे की, म्युझिकल ब्रॉडवे भारतीय चित्रपटांसारखेच आहे. हे कित्येक वर्षांपासून दुरावलेल्या दोन प्रेमी आहेत, जे पहिल्यांदा ब्रॉडवे शो कम फॉल इ लव्हः द डीडीएलजे म्युझिकलमध्ये पुन्हा एकत्र येणार आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपट आदित्यला पहिल्यांपासून इंग्रजीत बनवायचे होते आणि तेव्हा या चित्रपटात हिरो म्हणून टॉम क्रुझला घ्यायचे होते.

टॅग्स :आदित्य चोप्रा