Join us

आजच्या नायिकांशी रोमान्स करण्याची बिग बींची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:54 IST

अ मिताभ बच्चन यांनी सत्तरच्या दशकात अँग्री यंग मॅन म्हणून एन्ट्री केली आणि बॉलीवूडमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यावेळीच्या ...

अ मिताभ बच्चन यांनी सत्तरच्या दशकात अँग्री यंग मॅन म्हणून एन्ट्री केली आणि बॉलीवूडमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यावेळीच्या प्रत्येक आघाडीच्या हिरोईनसोबत त्यांनी काम केले आहे. आज वयाच्या सत्तरीतही ते आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मग बिग बींची अशी कोणती इच्छा आहे जी अपूर्ण आहे? ते म्हणतात, आजच्या नायिका या फार प्रगल्भ आणि नितांत सुंदर आहेत. कामाच्याबाबतीत त्यांचे डेडिकेशन थक्क करणारे आहे. त्यांच्यासोबत प्रमुख हिरोची भूमिका करायला, रोमान्स करायला मला आवडेल; मात्र या वयात ते शक्य नाही. कदाचित मी जर तरूण असतो तर ते होऊ शकले असते.