Join us

‘बिग बीं’नी घेतली नवी रेंज रोव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 03:19 IST

लॅण्ड रोव्हर या आलिशान गाड्यांच्या कंपनीने लॉन्च केलेल्या रेंज रोव्हर या एसयूव्हीचे नवे मॉडेल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ...

लॅण्ड रोव्हर या आलिशान गाड्यांच्या कंपनीने लॉन्च केलेल्या रेंज रोव्हर या एसयूव्हीचे नवे मॉडेल सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. गाड्यांचे शौकिन असलेल्या विविध क्षेत्रांतील दिग्गजांना ही कार भुरळ पाडत आहे. बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांनीही ही कार आपल्या ताफ्यात दाखल करून घेतली आहे. याबाबत जॅग्वार लॅण्ड रोव्हर इंडियाने (जेएलआरआयएल) आनंद व्यक्त केला. ‘बॉलिवूडमधील आयकॉन बिग बीं आमच्यासाठी खूप मौल्यवान ग्राहक आहेत. त्यांच्यासारख्या पर्सनॅलिटीकडे हे नवे मॉडल सोपवताना आम्हाला विशेष आनंद होतोय,’ असे जेएलआरआयएलचे अध्यक्ष रोहित सुरी यांनी सांगितले.