Join us

बिग बी, आमीर यांनी केले स्वराचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 09:33 IST

स्वरा भास्कर ही बॉलीवूडमधील सर्वांत टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘रांझणा’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटांतून तिच्या अभिनयाचे एक ...

स्वरा भास्कर ही बॉलीवूडमधील सर्वांत टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘रांझणा’ आणि ‘तन्नू वेड्स मन्नू’ या चित्रपटांतून तिच्या अभिनयाचे एक वेगळेपण ती प्रेक्षकांसमोर ठेवते. तिचा आता ‘निल बाते सन्नाटा’ नावाचा एक चित्रपट येतोय.आश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित चित्रपट अतिशय प्रोत्साहन देणारा, तसेच अभिनय दाखवणारा असा असल्याचे अमिताभ बच्चन, आमीर खान आणि सोनम कपूर यांनी सांगितले. किशोरवयीन मुलीच्या आईची स्वराने भूमिका केली आहे. अगोदर तिला वाटले की, करिअरच्या सुरूवातीलाच आईची भूमिका करणे कितपत योग्य आहे? पण, नंतर तिने चित्रपट करायचा ठरवला आणि बॉलीवूडमध्ये सध्या तिच्या चित्रपटातील अभिनयाची तुफान चर्चा सुरू आहे.ती म्हणाली,‘ दिग्दर्शकांनी जेव्हा सांगितले की, आई-मुलीचा हा चित्रपट असून मला वाटले की, यात मला मुलीची भूमिका असेल. मला जेव्हा कळाले तेव्हा मला धक्काच बसला. पण, बºयाच लोकांनी मला सांगितले की, हा रोल कदाचित तुझे करिअर उंचीवर नेऊन ठेवेल.}}}}}}}}