Join us  

पावडर विकता विकता पालटलं नशिब, सलमान खानचा सिनेमा मिळाला अन् रातोरात झाली सुपरस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 2:04 PM

बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट झाला.

सन 2003 मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या चित्रपटातील निर्जला आठवते? राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ  निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. अभिनेत्री भूमिका चावलाने या चित्रपटात  निर्जलाची भूमिका साकारली होती. भूमिकाने ही भूिका जिवंत केली होती. आज याच  निर्जलाचा अर्थात भूमिका चावलाचा वाढदिवस.

 21 ऑगस्ट  1978 रोजी दिल्लीमध्ये तिचा जन्म झाला. भुमिका चावलाने पावडरच्या जाहिरातीतून ग्लॅमरच्या दुनियेत पाऊल ठेवले. भूमिकाचे वडील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भूमिका तिच्या ३ भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. भूमिकाचा भाऊही भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. 

भूमिकाने म्युझिक व्हिडिओ आणि जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली.. यानंतर भूमिका साऊथ इंडस्ट्रीकडे वळली. 2000 मध्ये त्यांनी युवाकुडू या साऊथ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि यानंतर अचानक बॉलिवूडमध्ये  झळकली. बॉलिवूडच्या पहिल्याच चित्रपटात तिला सलमानसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘तेरे नाम’ सुपरडुपर हिट झाला. सलमान, या चित्रपटात संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया अशा सगळ्यांना या चित्रपटाचा फायदा झाला. अपवाद तो भूमिकाचा. कारण या चित्रपटानंतरही भूमिकाला म्हणावे तसे यश लाभले नाहीत. भूमिकाने तिच्या करिअरमध्ये 64 चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. भूमिकाचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर भूमिकाला 1.4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

 

टॅग्स :भूमिका चावला