Join us  

भूमी पेडणेकरने ‘पंख’ सोबत साजरा केला व्हॅलेन्टाईन डे, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 4:12 PM

ऋषीकेश येथे ‘बधाई दो’ या सिनेमाचे शूटींग करत असलेल्या भूमी पेडणेकरने आजचा व्हॅलेन्टाईन डे कसा साजरा केला तर ‘पंख’सोबत.

ठळक मुद्दे‘बधाई दो’  या सिनेमात भूमी पेडणेकर व राज कुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.

ऋषीकेश येथे ‘बधाई दो’ या सिनेमाचे शूटींग करत असलेल्या भूमी पेडणेकरने आजचा व्हॅलेन्टाईन डे कसा साजरा केला तर ‘पंख’सोबत. होय, दुपारपर्यंत शूटींग आटोपून भूमी ऋषीकेशच्या वंचित कुटुंबातील  मुलांच्या ‘पंख’ या शाळेत पोहोचली. यानंतरचे बराच वेळ भूमीने या मुलांसोबत साजरा केला.भूमीने तिच्या फेसबुक व इन्स्टा अकाऊंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. ‘पंख’च्या मुलांनी माझा व्हॅलेन्टाईन डे खास बनवला. तुम्हा सर्वांचे यासाठी आभार,’ असे तिने लिहिले. यावेळी भूमीने ‘पंख’मधील शेकडो मुलांना खास मेजवानी दिली.

‘श्री कृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता सर्वदमन डी बॅनर्जी यांची मैत्रिण अलंकृता बॅनर्जी गेल्या अनेकवर्षांपासून ‘पंख’ ही शाळा चालवले आहे. या शाळेत वंचित कुटुंबातील शेकडो मुले शिकतात.

‘बधाई दो’  या सिनेमात भूमी पेडणेकर व राज कुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ऋषिकेश येथे या सिनेमाचे शूटींग सुरु आहे. ‘बधाई दो’  या सिनेमात राजकुमार राव एका पोलीस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.

एक असा पोलीस अधिकारी ज्याची ड्यूटी महिला पोलिस ठाण्यात लागते. भूमी या सिनेमात पीटी शिक्षिका दाखवण्यात आली आहे. भूमी पेडणेकर व राजकुमार राव पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘बधाई हो’ सिनेमाचा लेखक अक्षत घिल्डियाल हा सुमन अधिकारीच्या मदतीने ‘बधाई दो’ सिनेमाचे संवांद लिहिणार असून ‘हंटर’ सिनेमाचा दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर