Join us  

पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 6:00 AM

तिने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं.

बॉलिवूड आणि साऊथमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री भूमिका चावलाने आतापर्यंत करिअरमध्ये अनेक दर्जेदार सिनेमा दिले आहेत. बॉलिवूडमध्ये सलमान खानसोबत आलेल्या तेरे नाम हा भूमिकाचा पहिला सिनेमा. या सिनेमाने भूमिकाला रातोरात स्टार बनवले. भूमिका चावला हिने आपल्या करियरची सुरूवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने हिंदीच नाही तर तेलगू, तमीळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी व पंजाबी चित्रपटात काम केलं. पंजाबी कुटुंबात जन्माला आलेल्या भूमिकाचा पहिला चित्रपट युवाकुडु हा होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या कुशी चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

 भूमिकाने अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं होतं. तेरे नाममधील तिच्या अभिनयाचं सगळीकडून खूप कौतूक झालं. त्यानंतर तिला हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकल्या नाहीत.

प्रोफेशनल लाईफशिवाय भूमिकाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं तर चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी भूमी योगाचे धडे गिरवित होती. भरत ठाकूर तिचे योगा ट्रेनर होते. योगा शिकता शिकता भूमिकाचा ट्रेनरवर जीव जडला. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर भूमिकाने भरतसोबत लग्न केलं. २०१६ मध्ये आलेल्या ‘धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ मध्ये भूमिका अखेरची दिसली होती. यामध्ये तिने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

टॅग्स :भूमिका चावला