Join us  

Bhool Bhulaiya 3: 'भूल भुलैया ३'मध्ये डान्सचा महासंग्राम, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन येणार आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:26 AM

'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) बद्दल चाहत्यांची उत्सुकता कमी होत नाहीये. त्याचवेळी आता याबाबत एक इंटरेस्टिंग बातमी समोर आली आहे. 'भूल भुलैया ३'मधील 'आमी जे तोमर' या गाण्यावर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि विद्या बालन (Vidya Balan) आमनेसामने येणार असल्याचे समजते आहे.

कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)च्या 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiya 3) या चित्रपटात भय आणि कॉमेडीसोबतच डान्सचा जोरदार धमाकाही पाहायला मिळतो. अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर 'भूल भुलैया' आणि कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiya 2) च्या यशानंतर आता त्याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी चित्रपटात काहीतरी खास घडणार आहे. विद्या बालन(Vidya Balan)च्या पुनरागमनामुळे चित्रपटातील उत्कंठा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटाचे निर्माते माधुरी आणि विद्या यांच्या डान्सचा महासंग्राम करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे. असे झाले तर प्रेक्षकांना एक उत्तम नृत्य स्पर्धा बघायला मिळू शकेल.

अभिनेत्री विद्या बालन आणि माधुरी दीक्षित समोरासमोर दिसणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. दोन्ही अभिनेत्रींमध्ये नृत्याची जबरदस्त स्पर्धा होणार आहे. या दोघांच्या आमने-सामने येण्याची तयारीही निर्मात्यांनी सुरू केली आहे. 'आमी जे तोमर' या गाण्यावर दोघेही परफॉर्म करणार असल्याचा दावा केला जात आहे. मीडियाच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर या गाण्याची कोरिओग्राफी सुरू आहे.

'रुह बाबा' असणार विद्या आणि माधुरीसोबत मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाणे चित्रपटातील सर्व मुख्य पात्रांना लक्षात घेऊन शूट केले जाणार आहे. या गाण्यात माधुरी दीक्षित आणि विद्या बालनसोबत 'रूह बाबा' म्हणजेच कार्तिक आर्यन देखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत निर्मांत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :विद्या बालनमाधुरी दिक्षित