भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहची को-स्टार अक्षरा सिंहला बेदम मारहाण; केस पकडून डोके भिंतीवर आदळले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 14:25 IST
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी आली आहे. होय, पवन सिंहने दारूच्या नशेत त्याची को-स्टार अक्षरा सिंह ...
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहची को-स्टार अक्षरा सिंहला बेदम मारहाण; केस पकडून डोके भिंतीवर आदळले!!
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी आली आहे. होय, पवन सिंहने दारूच्या नशेत त्याची को-स्टार अक्षरा सिंह हिला बेदम मारहाण केल्याचे उघड झाले आहे. पत्रकार शशिकांत सिंह यांनी फेसबुकवर या घटनेचा खुलासा केला. त्यानुसार, गुरूवारी रात्री सिलवासाच्या एका हॉटेलात ही घटना घडली. पवन सिंह व अक्षरा सिंह दोघही एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे होते. अक्षराचे शूटींग पूर्ण झाले होते. त्यामुळे मी मुंबईत परतणार होती. पण बरीच रात्र झाल्याने व गाडी स्वत: ड्राईव्ह करणार असल्याने अक्षराने सकाळी निघण्याची योजना बनवली. त्यामुळे गुरूवारी रात्री ती हॉटेलमध्येच होती. त्या रात्री पवन सिंह दारूच्या नशेत तर्र होता. अशास्थितीत तो आपल्या हॉटेलच्या रूमबाहेर येऊ लागला. अक्षराने त्याला रोखले. मात्र यामुळे पवन सिंहने तिला शिवीगाळ सुरू केली. यावरून दोघांत वाद झाला आणि याचदरम्यान पवन सिंहने अक्षराला मारहाण केली. हॉटेलच्या कर्मचाºयांनी मध्यस्थी करत अक्षराला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पवन सिंहने अक्षराचे केस पकडून तिचे डोके भिंतीवर आदळले. या मारहाणीत अक्षराच्या हाताला दुखापत झाल्याचे कळते. पवन सिंह आणि अक्षरा या दोघांच्या रिलेशनशिप आधी बरीच चर्चा होती. अनेक कार्यक्रमात पवनने अक्षराची ‘ये आपकी भाभी’ अशी ओळख करून दिली आहे. २००५ मध्ये पवनने नीलम नामक मुलीशी लग्न केले. पण लग्नानंतर तीनच महिन्यांत नीलमने आत्महत्या केली होती. यानंतर ५ मार्च २०१८ मध्ये पवनने ज्योती नामक मुलीशी लग्न केले.पवन सिंह हा भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार आहे. पार्श्वगायक अशीही त्याची ओळख आहे. २००८ मध्ये त्याचा ‘लॉलीपॉप लागेलू’ हा अल्बम खूप लोकप्रीय झाला आहे.अक्षरा ही सुद्धा भोजपुरीतील आघाडीची अभिनेत्री आहे. २०१३ मध्ये रवि किश्नसोबत ‘सत्यमेव जयते’ या भोजपुरी सिनेमातून तिने डेब्यू केला होता. ‘काला टीका’ आणि ‘सूयपुत्र कर्ण’ यासारख्या मालिकात ती दिसली आहे.