भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानी सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काजल जिममध्ये घाम गाळते, डाएटही पाळते. पण दिवसागणिक तिचे वजन वाढत आहे. याला कारण म्हणजे, काजलला पीसीओडी हा आजार आहे. यामुळे तिचे वजन कायम वाढत आहे.पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. हा अंडाशयाशी निगडीत आजार आहे. या आजारात स्त्री बीजकोषात अनेक गाठी तयार होतात. यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते. आजकाल अनेक तरूणी या आजाराने ग्रस्त आहेत. काजलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत, या आजाराबद्दल सांगितले आहे.
‘ I AM NOT 👉 OVARY 👈 REACTING. मी गेल्या दीड वर्षांपासून या आजाराने ग्रस्त आहे. सारी लक्षणे मला दिसत आहेत. त्यात लाज बाळगण्यासारखे वा लपवण्यासारखे काहीही नाही,’ असे तिने लिहिले आहे. काजलने एक फोटोही पोस्ट केला आहे. यात या आजाराच्या अनेक लक्षणांबदद्ल लिहिलेले आहे.