‘भावेश जोशी’ अखेर येणार; हर्षवर्धन लीड रोलमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 16:53 IST
व्रिकमादित्य मोटवानी यांचा ‘भावेश जोशी’ हा चित्रपट अखेर ट्रॅकवर आलाच. मोटवानी यांनी २०१४ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. ...
‘भावेश जोशी’ अखेर येणार; हर्षवर्धन लीड रोलमध्ये!
व्रिकमादित्य मोटवानी यांचा ‘भावेश जोशी’ हा चित्रपट अखेर ट्रॅकवर आलाच. मोटवानी यांनी २०१४ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र या ना त्या कारणाने हा चित्रपट रखडला होता.मात्र आता मोटवानी यांनी हा प्रोजेक्ट शेवटाला न्यायचे ठरवले आहे. होय, या चित्रपटासाठी अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर याला साईन करण्यात आले आहे. मोटवानी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही ‘भावेश जोशी’ घेऊन येणार आहोत. हर्षवर्धनला या चित्रपटासाठी साईन करण्यात आले आहे. पुढील महिन्यात शूटींग सुरु होईल,असे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम या चित्रपटात इमरान खान याची वर्णी लागणार असल्याची बातमी आली. मात्र काही मुद्यांवर एकमत न झाल्याने इमरान यातून आऊट झाला. मग या चित्रपटासाठी रणवीर सिंगला विचारणा झाल्याची बातमी आली. एवढेच नाही तर यापश्चात ‘भावेश जोशी’साठी सिद्धार्थ मल्होत्रा याचे नाव फायनल झाल्याचे वृत्त आले. मात्र यादरम्यान मोटवानी यांनी स्वत:च चित्रपटाच्या कथेबद्दल समाधानी नसल्याने चित्रपट लांबणीवर टाकला. मात्र आता हा चित्रपट येणार हे फायनल आहे. शिवाय यात हर्षवर्धन असणार हेही फायनल आहे..