Join us  

ट्रेलरनंतर बघा सलमानचा 'भारत' मधील रोमँटिक अंदाज, तोही स्लो मोशन मध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 3:53 PM

सलमान खान आपल्या फॅन्सना ईदच्या मुहूर्तावर सिनेमाची ट्रिट देणार आहे. नुकताच भारतचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला.

ठळक मुद्देदिशा पटानी आणि सलमनाची रोमाँटिक केमिस्ट्री दिसतेय'स्लो मोशन' गाण्याचे संगीत विशाल आणि शेखरने दिले आहे

सलमान खान आपल्या फॅन्सना ईदच्या मुहूर्तावर सिनेमाची ट्रिट देणार आहे. नुकताच भारतचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरनंतर सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आले आहे. यात दिशा पटानी आणि सलमनाची रोमाँटिक केमिस्ट्री दिसतेय. स्लो मोशन गाण्याचे संगीत विशाल आणि शेखरने दिले आहे.

स्लो मोशन गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदा सलमान खान आणि दिशा पटानी एका फ्रेममध्ये दिसतायेत. गाण्यात सलमान सर्कसमधल्या मौत का कुंआमध्ये स्टंट करताना दिसतोय. स्लो मोशनमध्ये सलमानचा रेट्रो लूक आहे तर दिशा पटानी साडीत सुंदर दिसतेय.

  

भारतमध्ये सलमान वेगवेगळ्या पाच लुकमध्ये दिसत असून या सगळ्याच लूकची चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटातील सगळे लूक परफेक्ट असावेत यासाठी स्वतः सलमानने बारकाईने लक्ष दिले आहे. त्याने अनेक लुक्स ट्राय केल्यानंतर या चित्रपटांमधील सगळ्या लूकची निवड केली आहे. भारतमध्ये सलमान खान, दिशासह कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू अशी कलाकारांची तगडी फौज आहे.

सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अली अब्बास जाफरने सांभाळली आहे. अलीने अनेक जणांसोबत चर्चा केल्यानंतर त्याने या चित्रपटातील सगळे लुक्स ठरवले आहेत. भारत हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला हा  सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भारत सिनेमात अॅक्शन, रोमान्स आणि देशभक्ती पाहायला मिळणार आहे आणि चार टप्प्यात या सिनेमाची कथा उलगडण्यात येणार आहे.  

टॅग्स :सलमान खानदिशा पाटनीभारत सिनेमा