Join us  

Bhagyashree ने शेअर केला आईसोबतचा फोटो, म्हणाले - तुझ्यात त्यांची झलक दिसते...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 5:42 PM

भाग्यश्रीचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. एका फॅनने लिहिलं की, आई फार सुंदर आहे आणि त्यांची झलक तुझ्यात दिसते.

'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. आज भाग्यश्रीच्या आईचा वाढदिवस आहे आणि तिने त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. हा फोटो तिच्या फॅन्सना फारच आवडला. तिचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

भाग्यश्रीने आईसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, 'मॉम, हॅप्पी बर्थडे. देव तुला चांगलं आरोग्य देवो. मौन शक्ती, ध्यैर्य, अपार सहनशक्ती आणि प्रतिबद्धता सारखे जीवनाचे धडे शिको. तू जशी आहेस तशी असण्यासाठी धन्यवाद'. अशा शब्दात भाग्यश्रीने तिच्या आईला त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या. हेही सांगितलं की, ती त्यांच्याकडे काय काय शिकली.

भाग्यश्रीचे फॅन्स या फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. एका फॅनने लिहिलं की, आई फार सुंदर आहे आणि त्यांची झलक तुझ्यात दिसते. एका दुसऱ्या फॅनने लिहिलं की, 'देवाची कृपा त्यांच्यावर सदैव रहावी. त्या फार सुंदर दिसत आहेत. एकाने लिहिलं की, तू तुझ्या आई एवढीच सुंदर आहे. लोक अशा वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :भाग्यश्रीबॉलिवूड