Join us  

‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्री अचानक का झाली बॉलिवूडमधून गायब?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 10:19 AM

अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा प्रचंड गाजला. या  चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना ...

अभिनेत्री भाग्यश्री हिचा ‘मैंने प्यार किया’ हा पहिलाच डेब्यू सिनेमा प्रचंड गाजला. या  चित्रपटात भाग्यश्रीने साकारलेली साधी-सरळ सुमन लोकांना मनापासून भावली. ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास लोक उत्सूक होते. पण पहिल्याच चित्रपटानंतर भाग्यश्री बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. खरे तर ‘मैंने प्यार किया’नंतर भाग्यश्रीकडे खूप मोठ मोठ्या आॅफर्स आल्यात पण भाग्यश्रीने त्या सगळ्या धुडकावून लावल्यात. का? तर याच ‘का’चे उत्तर भाग्यश्रीने दिले आहे.अलीकडे एका मुलाखतीत भाग्यश्रीने ‘का’वर मौन तोडले. ‘मैंने प्यार किया’ भाग्यश्री अचानक बॉलिवूडमधून गायब झाली, याचे कारण आहे, तिचे प्रेम. होय, बालपणीचा मित्र हिमालय दासानी याच्या प्रेमामुळे भाग्यश्रीने चित्रपटांच्या आॅफर्स नाकारल्या. तिने सांगितले की, ‘मी आणि हिमालय लहानपणापासूनचे मित्र. आमच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. पण माझ्या घरच्यांना आमचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळे हिमालय शिक्षणासाठी अमेरिकेत गेला, त्यावेळी आम्ही ब्रेकअप केले. तो अमेरिकेत असताना मी ‘मैंने प्यार किया’ साईन केला. अर्थात हा चित्रपट साईन करण्याआधी मी हिमालयच्या आई-वडिलांची परवानगी घेतली होती. कारण आज नसलो तरी उद्या मी व हिमालय सोबत असू, याची मला खात्री होती. हिमालयच्या घरच्यांना आमचे नाते मनापासून मान्य होते.अमेरिकेतील शिक्षण संपवून हिमालय भारतात परत आला. माझे कुटुंबीय तरीही त्याला स्विकारायला तयार नव्हते. एकदिवस मी हिमालयला फोन केला आणि हे नाते पुढे न्यायचे का? असा प्रश्न त्याला विचारला. मी घर सोडलेय, माझ्यावर प्रेम असेल तर मला घ्यायला ये, असे मी त्याला म्हटले. यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात हिमालय माझ्या घराबाहेर होता. आम्ही मंदिरात लग्न केले. हिमालयचे कुटुंब, सलमान आणि सूरत बडजात्या असे मित्र आमच्या लग्नात हजर होते. तोपर्यंत ‘मंैने प्यार किया’ सुपरहिट झाला होता. मला खूप आॅफर आल्यात. पण हिमालयच्या प्रेमात मी आकंठ बुडाले होते. शिवाय लग्नानंतर लगेच अभिमन्यूचाही जन्म झाला. याच कारणामुळे मी सगळ्या आॅफर्स नाकारत गेले. अर्थात मला त्याचा अजिबात पश्चाताप नाही.’१९९१ मध्ये आलेल्या‘ मैंने प्यार किया’साठी भाग्यश्रीला बेस्ट डेब्यूचा अवार्ड मिळाला होता. यानंतर तिने तामिळ, तेलगू, भोजपूरी अशा काही चित्रपटांत काम केले.