Join us

​‘बियॉन्ड द क्लाऊड्स’चा नवा ट्रेलर एकदा तरी पाहाचं!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 13:35 IST

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ हा चित्रपट लवकरच रिलीज होताय. आपल्या या पहिल्या-वहिल्या चित्रपटात ईशान रंगभूमी कलाकार मालविका मोहनन हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर याचा ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ हा चित्रपट लवकरच रिलीज होताय. आपल्या या पहिल्या-वहिल्या चित्रपटात ईशान रंगभूमी कलाकार मालविका मोहनन हिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मालविका ही  सिनेमेटोग्राफर के. यू. मोहनन यांची मुलगी आहे. ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’ हा मालविकाचाही पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’चा पहिला ट्रेलर आपण बघितलाच. आज ईशान व मालविकाच्या या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आऊट झालायं. पहिल्या ट्रेलरमध्ये ईशानची कथा दाखवली गेली होती. आज रिलीज झालेल्या या दुस-या ट्रेलरमध्ये मालविकाची कथा दिसतेय. या चित्रपटात ईशान व मालविका दोघेही भाऊ-बहिणीच्या भूमिकेत आहे. मालविकाला अचानक तुरुंगात जावे लागते आणि यानंतर ईशान आपल्या बहिणीला अनेक त-हेने तुरुंगाबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, असे या ट्रेलरमध्ये दिसते. माजिद मजीदी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या २० एप्रिलला रिलीज होणार आहे. साँग आॅफ स्पॅरोज , बारन , दी कलर आॅफ पॅराडाईज  आणि  चिल्ड्रेन आॅफ हेविन अशा जगप्रसिद्ध चित्रपटांसाठी मजीदी ओळखले जातात.  मजीदी यांचा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.  हा चित्रपट प्रेम, आयुष्य आणि नात्यांची कथा आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शूटींग मुंबईत पार पडलेय. रिलीजआधी अनेक चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेला आणि याठिकाणी या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली. आता भारतीय पे्रक्षक मजीदींच्या या चित्रपटाला आणि त्याआधी याच्या या दुस-या ट्रेलरला कसा प्रतिसाद देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. तूर्तास तुम्हीही ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’चा ट्रेलर बघा आणि तो कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.ALSO READ : ​‘बियॉन्ड द क्लाऊड’चा ट्रेलर आला! पाहा, शाहिदचा भाऊ ईशान खट्टरचा रफ अ‍ॅण्ड टफ अवतार!!