Join us

​‘बियॉन्ड द क्लाऊड’चा ट्रेलर आला! पाहा, शाहिदचा भाऊ ईशान खट्टरचा रफ अ‍ॅण्ड टफ अवतार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:57 IST

‘बियॉन्ड द क्लाऊड’ या चित्रपटाद्वारे ईशान बॉलिवूड डेब्यू करतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

शाहिद कपूरचा लहान भाऊ  ईशान खट्टर ‘धडक’मध्ये बिझी आहे, हे तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. या चित्रपटात ईशान खट्टर श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूरसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ईशान व जान्हवीच्या या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. ‘धडक’आधी ईशान ‘बियॉन्ड द क्लाऊड’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘बियॉन्ड द क्लाऊड’ या चित्रपटाद्वारे ईशान बॉलिवूड डेब्यू करतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.या चित्रपटात ईशान आमिर नामक मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘छोटा सा था मैं जब मां बाप गए...कार एक्सीडेंट में...१३ साल का था मैं बडा आदमी बनना था मुझे...’या ईशानच्या संवादाचे ‘बियॉन्ड द क्लाऊड’च्या ट्रेलरची सुरुवात होते. ईशान यात अगदी रफ अ‍ॅण्ड टफ भूमिकेत आहे.  ALSO READ : दीपिका पादुकोण नाही, मजीदींच्या चित्रपटात दिसणार मालविका मोहनन!माजिद मजीदी दिग्दर्शित या चित्रपटात  मल्याळम  अभिनेत्री मालविका मोहनन लीड अ‍ॅक्ट्रेसच्या भूमिकेत आहे. मालविका ही  सिनेमेटोग्राफर के. यू. मोहनन यांची मुलगी आहे. साँग आॅफ स्पॅरोज , बारन , दी कलर आॅफ पॅराडाईज  आणि  चिल्ड्रेन आॅफ हेविन अशा जगप्रसिद्ध चित्रपटांसाठी मजीदी ओळखले जातात. ‘बियॉन्ड द क्लाऊड’च्या निमित्ताने पहिल्यांदा ते बॉलिवूडमध्ये हात आजमावताना दिसणार आहेत. ‘बियॉन्ड द क्लाऊड’ हा चित्रपट येत्या १३ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे.  हा चित्रपट प्रेम, आयुष्य आणि नात्यांची कथा आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शूटींग मुंबईत पार पडलेय. रिलीजआधी अनेक चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवला गेलाय आणि याठिकाणी या चित्रपटाने बरीच प्रशंसा मिळवली. आता भारतीय पे्रक्षक मजीदींच्या या चित्रपटाला आणि त्याआधी याच्या ट्रेलरला कसा प्रतिसाद देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.