Join us  

Best Of 2018 : वर्षभरात 'या' अभिनेत्रींचा बोलबाला, इन्स्टा-फेसबुक युजर्सचाही 'कलिजा खलास झाला'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:39 AM

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर २ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे २ हजार ७०० पोस्ट शेअर केल्या असून ३८४ जणांना ती फॉलो करते.

१. बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे इन्स्टाग्रामवर सुमारे २ कोटी ६० लाख फॉलोअर्स झालेत. तिने आतापर्यंत सुमारे साडेसहाशेहून अधिक पोस्ट शेअर केल्या असून ७० जणांना ती फॉलो करते. या अकाऊंटवरून तिने शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंना बरीच पसंती मिळाली. 

२. प्रियांका चोप्रा - बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे सोशल मीडियावर २ कोटी ८० लाख फॉलोअर्स आहेत. तिने आजवर सुमारे २ हजार ७०० पोस्ट शेअर केल्या असून ३८४ जणांना ती फॉलो करते. 

३.आलिया भट- राजी, उडता पंजाब अशा विविध सिनेमांमधील भूमिकांनी रसिकांची मने जिंकलेल्या अभिनेत्री आलिया भटचे सोशल मीडियावर २ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. १ हजार २३६ पोस्ट तिने शेअर केल्या असून ४४६ जणांना ती फॉलो करते.

४. अनुष्का शर्मा - झिरो सिनेमाची अभिनेत्री अनुष्का शर्माही सोशल मीडियावर बरीच अक्टिव्ह असते. तिचे १ कोटी ९० लाख फॉलोअर्स असून ती ९८ जणांना फॉलो करते. अनुष्काने ७३५ पोस्ट शेअर केल्या आहेत. 

५. सोनम कपूर - वीरे दी वेडिंग स्टार अभिनेत्री सोशल मीडियावरून फॅन्सशी संवाद साधते. सोनमचे सोशल मीडियावर १ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. ३ हजार ५९८ पोस्ट तिने शेअर केल्या आहेत.

६. जॅकलिन फर्नांडिस - जुडवाँ-२, हाऊसफुल्ल-३ स्टारर अभिनेत्री जॅकलिनचे सोशल मीडियावर २ कोटी १० लाख फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. 

७. सनी लिओनी - पॉर्न स्टार आणि बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनीचे कोट्यवधी चाहते आहेत. सोशल मीडियावरही सनीचे दीड कोटी फॉलोअर्स आहेत. २ हजार ४५५ पोस्ट तिने शेअर केल्या आहेत. 

८. श्रद्धा कपूर - अभिनेत्री श्रद्धा कपूरने सिनेमातील भूमिकांनी रसिकांची मने जिंकली आहेत. लवकरच ती रुपेरी पडद्यावर सायना नेहवाल साकारणार आहे. सोशल मीडियावर तिचे २ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत.

९. कॅटरिना कैफ - बॉलीवुडची चिकनी चमेली कॅटरिना कैफचे सोशल मीडियावर १ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. कॅट ३३७ जणांना फॉलो करते.

१०. दिशा पटानी- महेंद्रसिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी सिनेमातून मनं जिंकलेल्या दिशाचे सोशल मीडियावर १ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. 

 

टॅग्स :बेस्ट ऑफ 2018दीपिका पादुकोणप्रियंका चोप्रादिशा पाटनीआलिया भट