Join us  

नवनिर्वाचित महिला खासदार तुर्कीत अडकल्या लग्नेबडीत, पहा त्यांच्या शाही लग्न सोहळ्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:49 PM

पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहां नुकत्याच लग्नबेडीत अडकल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहां नुकत्याच लग्नबेडीत अडकल्या आहेत. नुसरत यांनी बॉयफ्रेंड निखिल जैन यांच्यासोबत तुर्की येथे लग्न केले. या सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली.नुसरत व निखिल यांचा रिसेप्शन सोहळा ४ जुलैला कोलकाता येथे होणार आहे.

नुसरत यांनी तुर्कीतील बोद्रुम शहरातील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये निखिल जैन यांच्यासोबत सात फेरे घेतले. या विवाहाला त्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते. नुसरत यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीने डिझाईन केलेला लेहेंगा घातला होता. 

नुसरत व निखील यांची भेट गतवर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि पुढे प्रेम. काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुसरत जहां बंगाली सिनेसृृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

२०११ मध्ये ‘शोत्रु’ या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. यानंतर खोका ४२०, खिलाडी, जमाई ४२०, लव एक्सप्रेस, क्रिसक्रॉस, नकाब अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ बशीरहाट मतदारसंघातून तब्बल साडे तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. नुसरत यांनी काँग्रेसच्या खासदाराचा पराभव केला होता.

खासदार म्हणून निवडून आल्यानंतर नुसरत आणि मिमी या दोघींनी संसद भवनाबाहेर आपआपल्या ओळखपत्रांसह फोटोसेशन केले होते. त्यांची ती छायाचित्रे लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

त्यांनीच ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. पण हे फोटो पाहून आनंद व्यक्त करण्याऐवजी लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोडच उठवली होती.

टॅग्स :ठाणे महापालिका