Join us  

स्टेशनवर गाणा-या ‘रानू दी’च्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आली ही व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 10:23 AM

कधी रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू दी अर्थात रानू मंडाल हिचे आयुष्य एका क्षणात बदलले. रस्त्यावरून ती थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली

ठळक मुद्देएतींद्र हा  सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि रानाघाटमध्येच राहतो.

कधी रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू दी अर्थात रानू मंडाल हिचे आयुष्य एका क्षणात बदलले. रस्त्यावरून ती थेट बॉलिवूडच्या स्टुडिओपर्यंत पोहोचली. बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार व गायक हिमेश रेशमिया याच्या चित्रपटासाठी तिने पहिले गाणे रेकॉर्ड केले. ही सगळी किमया साधली ती तिच्या एका व्हिडीओने.

होय, रस्त्यावर गातांनाचा तिचा व्हिडीओ एका व्यक्तिने सोशल मीडियावर टाकला. तो व्हायरल झाला आणि रानू दीच्या नशीबाने कलाटणी घेतली. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करणा-या त्या व्यक्तिला रानू कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आयुष्यात ‘देवदूत’ बनून आलेली ही व्यक्ती कोण हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर या व्यक्तिचे नाव आहे, एतींद्र चक्रवर्ती.

 रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनव गाणी गात स्वत:च पोट भरत असे. अनेक जण तिच्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध होत. काहीजण तिचे कौतुक करत तर काही जण तिच्या हातात चार-दोन रूपये टिकवून पुढे चालते होत. पण एतींद्र चक्रवर्तीने एक दिवस रस्त्यावर गाणाºया रानूला गाताना बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला. रानूलता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या व्हिडीओने रानूचे आयुष्य बदलले.

 रानूचा हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडमधून तिला गाण्याच्या आॅफर्स यायला लागल्या. हिमेश रेशमिया याने रानूला पहिली संधी दिली. रानूने बॉलिवूड स्टुडिओत पहिले गाणे रेकॉर्ड केले, त्यावेळी एतींद्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता.  रानूला ही संधी दिल्याबद्दल एतींद्र्रने हिमेशचे आभार मानले. एतींद्र हा  सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि रानाघाटमध्येच राहतो.

टॅग्स :हिमेश रेशमियाबॉलिवूड