Join us

हाफ गर्लफ्रेंडच्या चित्रीकरणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 14:39 IST

चेतन भगतच्या हाफ गर्लफ्रेंड या प्रसिद्ध कादंबरीवर बनवण्यात येणाऱया हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ...

चेतन भगतच्या हाफ गर्लफ्रेंड या प्रसिद्ध कादंबरीवर बनवण्यात येणाऱया हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत सुरू झाले असल्याचे हाफ गर्लफ्रेंडचे लेखक चेतन भगत यांनी सोशल नेटवर्किंगवर म्हटले आहे. हाफ गर्लफ्रेंड या कादंबरीत माधव झा आणि रिया सोमानी यांची प्रेमकथा वाचायला मिळाली होती. हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटात अर्जुन कपूर माधवची भूमिका साकारत असून चेतनने अर्जुनचा चित्रीकरणाच्यावेळेचा फोटो पोस्ट केला आहे. कांदबरीत माधव हा खूप चांगला फूटबॉलपट्टू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चेतनने पोस्ट केलेल्या फोटोत अर्जुन आपल्याला फुटबॉल खेळतानाच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्सची आहे.