Join us

बेबोचा स्टनिंग सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 22:25 IST

प्रत्येकाला स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणे अपरिहार्य असते. पण, सेलिब्रिटी म्हटल्यानंतर तर आणखीच जास्त जबाबदारी येते. बॉलीवूडमधील सर्वच सेलिब्रिटी हे ...

प्रत्येकाला स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देणे अपरिहार्य असते. पण, सेलिब्रिटी म्हटल्यानंतर तर आणखीच जास्त जबाबदारी येते. बॉलीवूडमधील सर्वच सेलिब्रिटी हे स्वत:च्या फिटनेस आणि वर्कआऊटकडे जास्त लक्ष देताना दिसतात.जीम, वर्कआऊट करणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. नुकताच करिना कपूर खानने सोशल मीडियावर तिचा वर्कआऊट सेल्फी पोस्ट केला आहे. तिची ट्रेनर आणि इन्ट्रक्टर अनुष्का परवानी हिने योगा आणि पायलेट्स सेशन झाल्यानंतर सेल्फी काढला होता.हा फोटो पाहिल्यानंतर असे वाटते की, असा एक तरी दिवस जाईल का ज्यावेळी करिना स्टनिंग दिसणार नाही. काही जण तर घामाने अक्षरश: गळून जातात, पण करिना मात्र जास्तीत जास्त ग्लोर्इंग दिसते आहे.