Join us

​परिणीतीला बाराच्या ठोक्याला कुणी दिले वाढदिवसाचे सरप्राईज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 13:47 IST

आज( २२ आॅक्टोबर) हा अभिनेत्री परिणीती चोप्राचा वाढदिवस. आज परी तिचा २८ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. पण ख-या अर्थाने काल रात्री १२च्या ठोक्याला परिणीतीचा वाढदिवस असा काही सेलिब्रेट झाला की, तो तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला

आज( २२ आॅक्टोबर) हा अभिनेत्री परिणीती चोप्राचा वाढदिवस. आज परी तिचा २८ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. पण ख-या अर्थाने काल रात्री १२च्या ठोक्याला परिणीतीचा वाढदिवस असा काही सेलिब्रेट झाला की, तो तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. होय, काल रात्री परीला वाढदिवसाचे अप्रतिम सरप्राईज मिळाले. हे सरप्राईज कुणी दिले माहितीयं....? नाही...नाही...लगेच तर्क काढू नका. परिणीतीच्या काही चाहत्यांनी तिला हे भारी सरप्राईज दिले. परी राहत असलेल्या अपार्टमेंटबाहेर काल १२ च्या ठोक्याला काही चाहत्यांनी तिचा वाढदिवस साजरा केला. परीसाठी त्यांनी केक़, वेगवेगळ्या भेटवस्तू, फुले, ग्रीटिंग्सही आणले.  परी बाहेरून घरी परतली तशी तिच्या अपार्टमेंटच्या वºहांड्यातील टेबल फुलांनी व भेटवस्तूंनी भरून गेला होता.  चाहत्यांचे हे प्रेम व त्यांनी दिलेल्या भेटवस्तू पाहून परी भारावून गेली. तिच्या चेहºयावर नकळत मोठ्ठे हसू उमलले. या क्षणांचा एक व्हिडिओही परीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘What an amazingggg surprise!! I came home to find my fans with cakes and gifts!! Thankyou sooo much guys this means alot. I dont know why this video is off sync!! Hahhaa birthday madness’ असे मस्त कॅप्शन तिने दिले आहे. तुम्हीही बघा तर!!अलीकडे परिणीतीने ‘मेरी प्यारी बिंदू’चे शूटींग पूर्ण केले. सध्या ती सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत एका चित्रपटात बिझी आहे.