Join us

​‘बॅन्जो’चा टीजर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 17:15 IST

रितेश देशमुख आणि नरगीस फाकरी यांची मुख्य भूमिका असलेला ‘बॅन्जो’ या चित्रपटाचा टीजर आज सोमवारी आऊट झाला. या चित्रपटातील ...

रितेश देशमुख आणि नरगीस फाकरी यांची मुख्य भूमिका असलेला ‘बॅन्जो’ या चित्रपटाचा टीजर आज सोमवारी आऊट झाला. या चित्रपटातील रितेशच्या न्यू लूकने सर्वांचीच उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. आता तर ‘बॅन्जो’तील रितेशच्या अ‍ॅक्शन अवताराचीही चर्चा आहे. त्यामुळे चित्रपटातील रितेशचा अ‍ॅक्शन अवतार पाहणेही रोचक ठरणार आहे. रितेशने यात एका बॅन्जो कलाकाराची भूमिका साकारली आहे. तर नरगीस डीजेच्या भूमिकेत आहे. असे असताना टीझरमध्ये ती मस्तपैकी नऊवारी साडीत दिसते आहे. टीजर बघता, ‘बॅन्जो’ फुल्ल टू अ‍ॅक्शन आणि म्युझिक असणार आहे, हे दिसतेय. रितेश आणि नरगीसची यातील केमिस्ट्रीही एकदम हॉट आहे. आणखी एक विशेष म्हणजे टीजरला आवाज कुणी दिलाय, माहितीयं??? अभिषेक बच्चन. तेव्हा पाहा तर ‘बॅन्जो’चा हा टीजर...